ब्रेनवृत्त । मुंबई
जेष्ठ अभिनेते अनुपम श्याम (Anupam Shyam) यांचे अनेक अवयव निकामी झाल्यामुळे आज (सोमवार) पहाटे निधन झाले. ६३ वर्षीय अभिनेत्याला गेल्या आठवड्यात मूत्रपिंडाच्या संसर्गामुळे शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनुपम यांचे मित्र व अभिनेता यशपाल शर्मा यांनी त्यांच्या निधनाबद्दल वृत्तवाहिन्यांना सांगितले.
दूरचित्रवाहिनीवरील मन की आवाज :प्रतिज्ञा या हिंदी मालिकेतील त्यांची ‘ठाकूर सज्जन सिंग’ची भूमिका अतिशय गाजली. सोबतच, जेष्ठ अभिनेते अनुपम श्याम यांनी स्लमडॉग मिलियनेअर, हल्ला बोल आणि बँडिट क्वीन यांसारख्य बहुचर्चित चित्रपटांमध्येही अभिनय केले आहे. चार दिवसांपूर्वी त्यांना मूत्रपिंडाच्या संसर्गाच्या त्रासामुळे गोरेगावच्या लाइफलाइन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे वृद्धापकाळाने निधन!
अभिनेता यशपाल शर्मा म्हणाले की, अनुराग आणि कांचन या त्यांच्या भावांच्या उपस्थितीत श्याम यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. “डॉक्टरांनी 40 मिनिटांपूर्वी आम्हाला त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. त्यावेळी मी त्यांचे भाऊ अनुराग आणि कांचनसोबत रुग्णालयात होतो. त्यांचा मृतदेह अजूनही रुग्णालयात आहे”, असे अनुपम यांनी वृत्तवाहिन्यांना रात्री २ वाजता सांगितले.
“त्यांच्या मृतदेहाला सकाळी त्यांच्या निवासस्थानी म्हाडा कॉलनी, नवीन दिंडोशी येथे आणले जाईल. नंतर दिवसा त्यांच्यावर अंत्यसंस्कार होईल”, असेही शर्मा म्हणाले.
I got to know that he's no more. So we rushed here & found he was still breathing. The doctor later declared him dead. He was hospitalised for 4 days. He had high blood sugar & used to take injections during shooting of his last film: Actor Yashpal Sharma on Anupam Shyam's death pic.twitter.com/iJHfLdbv45
— ANI (@ANI) August 8, 2021
सुमारे तीन दशकांच्या अभिनयाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत श्यामने सत्य, दिल से, लगान, हजारों ख्वाइशें ऐसी अशा चित्रपटांमध्ये काम केले. तसेच, स्टार प्लसवर वाहिनीवर २००९ मध्ये प्रसारित झालेल्या मन की आवाज: प्रतिज्ञा मध्ये ठाकूर सज्जन सिंगच्या भूमिकेसाठी समीक्षकांनी त्यांची खूप प्रशंसा केली.
हेही वाचा । संत साहित्य अभ्यासक डॉ. नरेंद्र कुंटे यांचे निधन!
नुकतीच त्यांनी मन की आवाज:प्रतिज्ञा या कार्यक्रमाच्या दुसऱ्या आवृत्तीची शूटिंग सुरू होती. गेल्या वर्षी त्यांचे बंधू अनुराग यांनी पीटीआयला सांगितले होते, की श्याम डायलिसिसच्या उपचारातून जात होते आणि त्यादरम्यान ते पडले. त्यामुळे त्यांना गोरेगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
अनुपम श्याम यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या उपचारासाठी मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या अनेक मित्रांकडून मदतीची विनंतीही केली होती.
Join @ मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in