प. बंगालमध्येही सीबीआयला ‘नो एन्ट्री’

आंध्रप्रदेश पाठोपाठ पश्चिम बंगलमध्येही केंद्रीय तपास यंत्रणेच्या धडक कारवायांवर बंदी घालण्यात आली आहे.

 

वृत्तसंस्था

कोलकाता, १६ नोव्हेंबर

आधीच देशात केंद्रीय तपास यंत्रणेचे (सीबीआय) प्रकरण  चर्चेत असताना, आंध्रप्रदेश पाठोपाठ पश्चिम बंगाल सरकारनेही आता राज्यात सीबीआयच्या कारवाई बंदी आणली आहे.

देशात मागील काही आठवड्यांपासून सुरू असलेली ‘सीबीआय विरुद्ध सीबीआय’ ही लढाई आता ‘केंद्र विरुद्ध राज्य सरकार’ अशी झाली असल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारित काम करणारी स्वतंत्र तपास यंत्रणा ‘सीबीआय’ला काल आंध्रप्रदेश सरकारने जोरदार धक्का दिला. आंध्रप्रदेशने राज्यातील सीबीआय कारवायांवर बंदी आणली आहे. त्यापाठोपाठ पश्चिम बंगालमध्येदेखील सीबीआयसाठीचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

मोदी सरकारमधून बाहेर पडता पडताच आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शासनाला मोठा धक्का दिला होता. देशात सुरू असलेल्या ‘सीबीआय विरुद्ध सीबीआय’ या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नायडू यांनी दिल्लीच्या विशेष पोलीस दलाला संमती नाकारली होती. त्यानंतर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही राज्यात सीबीआयवर बंदी आणली आहे. यामुळे देशातील मुख्य तपास यंत्रणेला या राज्यांमध्ये तपासणीसाठी विशेष परवानगी घ्यावी लागेल.

पंतप्रधान मोदी केंद्रीय संस्थांचा गैरवापर करून राज्यांमध्ये त्यांद्वारे अनावश्यक कारवाया करत आहेत. यामुळे राज्यातील लोकांचा केंद्रावररील विश्वास कमी होत चालल्याचे सांगत विविध विरोधी पक्ष केंद्राच्या विरोधात उभे झाल्याचे दिसते.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: