Site icon MarathiBrain.in

हमजा बिन लादेनच्या खात्म्याला ट्रम्प यांचा दुजोरा

वृत्तसंस्था, वॉशिग्टन

कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनला ठार करण्यात आले असल्याचे वृत्त प्रकाशित होत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: या वृत्ताला दुजोरा देत, दहशतवाद विरोधी कारवाईत हमजा बिन लादेनचा खात्मा करण्यात आला असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेवर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला करणाऱ्या ओसामा बिन लादेन याचा मुलगा हमजा बिन लादेन याला ठार करण्यात आले असल्याचे वृत्त समोर येत आहे. ओसामा बिन।लादेनच्या एकूण २० मुलांपैकी हमजा हा १५वा मुलगा आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमजच्या ठार होण्याबाबतच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ट्रम्प म्हणाले की, “अफगाणिस्तान-पाकिस्तान क्षेत्रात हमजा लादेनला ठार करण्यात आले आहे.” मात्र, ही कारवाई कधी करण्यात आली याबाबत कोणतीही माहिती ट्रम्प यांनी अद्याप दिलेली नाही. ओसामा बिन लादेनची एकूण 20 मुलं आहेत, त्यापैकी हमजा हा लादेनचा 15 वा मुलगा होता.

स्रोत : ट्विटर

दरम्यान, याआधीही हमजा लादेनला ठार केल्याची बातमी अमेरिकी माध्यमांतून समोर आली होती. मात्र त्यावेळीही याबाबत कुणी स्पष्टीकरण दिले नव्हते. अमेरिकेने  2017 मध्ये जारी केलेल्या दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत हमजा बिल लादेनचा समावेश होता. त्यावेळी एनबीसी न्यूजनेही हमजा बिन लादेनचा खात्मा केल्याचा दावा केला होता. एनबीसीने याबाबत अधिक माहितीसाठी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यांच्या संपर्कही साधला होता. मात्र ट्रम्प यांनी याबाबत कोणतेही वक्तव्य करण्यास नकार दिला होता.

 

◆◆◆

Exit mobile version