‘डेक्सामेथासोन’च्या वापरास ‘डब्ल्यूएचओ’ची परवानगी

ब्रेनवृत्त, २७ जून

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गंभीर अवस्थेत असणाऱ्या कोरोनासंक्रमित रुग्णांवर ‘डेक्सामेथासोन‘ (Dexamethasone) या औषधाने उपचार करण्यास परवानगी दिली आहे. तसेच मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या व ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या कोरोना विषाणूबाधित रुग्णांच्या उपचारपद्धतीमध्ये ‘मेथाइलप्रेड्निसोलोन’ला (Methylprednisolone) पर्याय म्हणून डेक्सामेथासोन हे औषध वापरता येणार आहे.

डेक्सामेथासोन’ हे उत्तेजक संप्रेरक (जेनेरिक स्टेरॉइड) प्रकारातील औषध आहे. यूकेमध्ये झालेल्या संशोधनात कोरोनाबाधित चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांवर डेक्सामेथासोन औषध प्रभावी असल्याचे समोर आले होते. त्यानंतर, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनामुळे गंभीर अवस्था असलेल्या रुग्णांना हे औषध देण्यास परवानगी दिली. त्याचबरोबर, डेक्सामेथासोन हे औषध प्रामुख्याने संधीवात, अ‍ॅलर्जी, दमा आणि काही प्रकारच्या कॅन्सरमध्ये उपचारासाठी वापरले जाते.

“सध्या डेक्सामेथासोन औषध करोना रुग्णांना लागू पडतेय, अशी प्राथमिक माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे आता वेगाने या औषधाचे उत्पादन वाढवून जगभरात वितरण करणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या भागांमध्ये जास्त गरज आहे, तिथे हे औषध पोहोचवण्याची गरज आहे, अशी भूमिका जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घॅब्रेसिस यांनी मांडली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, ”औषधासंबंधी प्राथमिक माहिती उपलब्ध आहे, ही दिलासा देणारी बाब आहे. आता वेगाने या औषधाचे उत्पादन वाढवून जगभरात वितरण करणे आवश्यक आहे.”

ब्रेनबिट्स |  ‘कोव्हिड-१९’वर प्रभावी ठरणारे ‘डेक्सामेथासोन’ म्हणजे नक्की काय ?

महत्त्वाचे म्हणजे हे औषध स्वस्तात उपलब्ध असून डेक्सामेथासोनचा डोस कमी प्रमाणात दिल्यास  गंभीर अवस्था असलेल्या तीन रुग्णांपैकी एकाचे प्राण वाचवता येतात.  असा निष्कर्ष संशोधकांनी या अभ्यासातून मांडला आहे. या औषधामुळे मृत्यू दर कमी होत आहे. कोरोनामुळे व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना डेक्सामेथासोनचा डोस दिल्यानंतर ते रुग्ण बरे होत असल्याचे दिसले आहे.

दरम्यान, अमेरिकेतील ऑक्सफर्ड विद्यापीठाने २,१०० कोरोना संक्रमित रुग्णांवर डेक्सामेथासोनची चाचणी करण्यात आली. यात कोरोना संक्रमित २१०० रुग्णांना सुमारे १० दिवस ६ मिलीग्रॅमचा डोस देण्यात आला. कोरोनामुळे व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना डेक्सामेथासोनचा डोस दिल्यानंतर ते रुग्ण बरे होत असल्याचे दिसले आहे. तसेच, डेक्सामेथासोनचा कमी प्रमाणात डोस देऊन गंभीर अवस्था असलेल्या तीन रुग्णांपैकी एकाचे प्राण वाचवता येतात. असे निदर्शनास आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: