शेतकरीच धारेवर का?

ब्रेनसाहित्य | लेख 

कृषीप्रधान भारत देशात पूर्वी राजेशाही होती. त्यावेळी राजेशाहीला सर्वात मोठा महसूल शेतीमधून मिळायचा. ह्याच राजेशहीत कधी कधी अतिरिक्त कर लादून शेतकऱ्यांचं रक्त शोषणाऱ्या राजेशाहीदेखील थाटात असायच्या. परंतु इतिहास साक्षीला आहे, जेव्हा शेतकऱ्यांवर, कष्टकऱ्यांवर आणि कर्मकर्यांवर अन्याय, अत्याचार झालेत, त्यांना धारेवर धरण्यात आले, तेव्हा या सर्व कष्टकरी व शेतकरी वर्गाला न्याय देण्यासाठी सोळाव्या शतकाच्या मध्यंतरी शिवराज्यासारखं लोकांचं राज्यही उभ झालं. नंतरच्या काळात जगात औद्योगिक क्रांतीचे वारे वाहू लागले. पण परत एकोणीसव्यां शतकाच्या प्रारंभी हाच कृषीप्रधान भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या खाईत लोटला गेला.

ब्रिटिश काळात कृषी प्रधान देशाच्या शेतकऱ्यांना धारेवर धरण्याचा सपाटा चालला. कृषीप्रधान भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून जवळपास दिडशेपेक्षाही जास्त वर्षांनंतर स्वतंत्र झाला. आणि आज स्वतंत्र होऊन भारत देश ७५च्या उंबरठ्या वर आहे. पण कृषीप्रधान भारत सध्या कृषीप्रधान नाही, तर शहरातील मोठमोठ्या उद्योगांमुळे तो वेगळा ‘उद्योगप्रधान इंडिया’ झाला आहे.

हेही वाचा : ‘बा! तू जुगार हारलास

स्वातंत्र्यानंतर देशासमोर अन्नाचा तुटवडा उद्भवला, तेव्हा संपूर्ण देशाला पोसण्याची (अन्नाची समस्या मिटवण्याची) जबाबदारी शेतकऱ्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. त्या उपद्व्यापामध्ये खरी देशभक्ती जागृत होऊन आपल्या औद्योगिक उत्पादनाकडे लक्ष केंद्रित केले असताना, शेतकऱ्यांचे उत्पन्न मात्र घटत गेले. तरीही स्वतःला सावरत कृषीप्रधान देशाला शेतकऱ्यांनी जगवलं. मग त्याच शेतकऱ्याला नेहमीच धारेवर धरण्याचा प्रयत्न होतो, तो का होतो? इंडियामधील उद्योग प्रधान निर्मात्यांना का नाही? तर, “ते देशाची अर्थव्यवस्था बळकट करतात”, असं गोंडस उत्तर देऊन कुणीही मोकळं होईल. कदाचित त्यामध्ये कधी विजय माल्ल्या, निरव मोदी सारखे कर्ज बुडवे यांचे अर्थव्यवस्थेला बळकट करणाऱ्यांच्या यादीत देशभक्त म्हणून नाव अग्रस्थानी असेलही. परंतु शेतकरी स्वतःच्या इमानदारीने मातीशी रक्ताच पाणी करून दोन हात करत “कर्जाताच जगतो आणि कर्जाताच मरतोही.” तरीही तो धारेवरच, का?

राजकारण्यांची आश्वासने ही तर हवेत बाण सोडल्यागतच. हा सोडलेला बाणही परत येत नाही आणि आश्वासनेही कधी पूर्ण होत नाही. मात्र निवडणुकीच्या वेळेला शेतकरी धारेवर धरला नाही तर निवडणूक जिंकणार कशी? भारतात निवडणूक जिंकून निवडून आलेले उमेदवार अलगदपणे इंडियाची वाट धरतात!

असो, तो त्यांचा नेहमीचाच नित्यक्रम आहे. आसमानी संकटांना सामोरे जात अर्धपोटी उपाशी राहून इतरांनी सुखाचे दोन घास मिळावे, यासाठी नेहमीच प्रयत्नवत असतो तो शेतकरीच! व्यवस्थेचा निष्काळजीपणा, महामंडळाचा शेतकऱ्यांना बोगस बियाण्याचा पुरवठा आणि सेवा हा शब्द अगदी मधोमध वापरून सेवेचा दूरदूरपर्यंत पत्ता नसलेले, कृषी सेवा केंद्राचा अगदी गरजेच्या वेळेला संप हे सर्व शेकऱ्यांनाच फक्त धारेवर धरतात. यांतील कुणालाही शेतकरी काही बोलू शकत नाही, यांच्याविरुद्ध न्याय मागू शकत नाही. तो इमानदारीने जगतो, आपल्या स्वप्नांना मूठमाती देतो, आणखी बरंच काही सहनही करतो, तरीही शेतकरी धारेवरच धरला

लेख : तुषार भा. राऊत

ई-पत्ता : rautt9948@gmail.com

मो. नं. ८४०७९६३५०९

◆◆◆

(इथे प्रकाशित होणाऱ्या लेख, साहित्य व विचारांशी मराठी ब्रेन सहमत असेलच असे नाही.)

Join @marathibraincom

विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: