पत्र-संस्कृती जतनासाठी ‘वर्डालय’चा पुढाकार : ‘खुली पत्रलेखन स्पर्धा’

ब्रेनवृत्त | मुंबई


एकेकाळी पत्र हे दूरसंवादाचे एकमेव माध्यम होते. कालपरत्वे संवाद माध्यमांचे जाळे विस्तारत गेले आणि पत्र संस्कृती लोप पावत चालली. पण या संस्कृतीचा अमूल्य ठेवा काळाच्या पडद्याआड जाऊ न देण्याच्या उद्देशाने वर्डालय मिडीया हाऊसने खुल्या पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे.

समाजमाध्यमांचे वाढते प्रस्थ आणि सुलभ संवादमाध्यमे उपलब्ध झाल्याने पत्रांची देवाणघेवाण पूर्णतः थांबली आहे. पण स्वतःच्या हातांनी पत्रांमध्ये ओतला जाणारा शब्दरूपी मायेचा ओलावा अन्य माध्यमांत अनुभवता येत नाही. त्यामुळे ही संस्कृती जपायला हवी. त्यासाठी वर्डालय मिडीया हाऊसने पुढाकार घेत लिहित्या हातांना बळ देण्यासाठी ही अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा नि:शुल्क असून खुल्या स्वरुपात आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी १० ऑगस्ट २०२१ पूर्वी पत्र पाठविणे आवश्यक आहे. 

 ब्रेनसाहित्य | फोटो आणि नमी

● पत्रलेखन स्पर्धेचे नियम व स्वरूप

– पत्रातील मजकूर विषयानुरूप असावा, पत्रलेखन मराठी, हिंदी आणि इंग्रजी यापैकी कोणत्याही एकाच भाषेत असावे व पत्र टायपिंग फॉरमॅटमध्येच असणे अनिवार्य आहे.

– पत्र पाठविताना स्वतःचे पूर्ण नाव, वय, ठिकाण, ई-मेल पत्ता आणि संपर्क क्रमांक लिहिणे आवश्यक आहे.

– स्पर्धकांनी पत्र फक्त व्हाट्सॲप मेसेज किंवा मेलव्दारे पाठवावे. कृपया फोन करू नये.

– आयोजकांचा आणि परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धेच्या संपूर्ण स्वरूपात बदल करण्याचे अधिकार आयोजकांनी राखून ठेवले आहेत.

– विजेत्यांना रोख बक्षिसे, ग्रंथ आणि प्रमाणपत्र देण्यात येतील. प्रथम क्रमांकास १ हजार रुपये, द्वितीय क्रमांक ७०० रुपये आणि तृतीय क्रमांक पटकविणाऱ्यास ५०० रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. त्याशिवाय वाचकांच्या पहिल्या पसंतीच्या पत्रास १००० रुपये रोख, ग्रंथ व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

● पत्रलेखनाचे विषय-

१) पावसाला पत्र

2) महापुरुषाला पत्र

3) नकार दिलेल्या प्रियकर/प्रेयसीला पत्र

4) विठ्ठलाला पत्र

5) वृध्दाश्रमातून आपल्या मुलाला पत्र

6) तुम्हाला आवडत्या कोणत्याही विषयाला पत्र

यांपैकी कोणत्याही एका विषयावर पत्र लिहून विहित मुदतीत खालील पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन वर्डालय मिडीया हाऊसतर्फे करण्यात आले आहे.

● पत्र कुठे पाठवाल?

• संपर्क क्रमांक- 9321836215 (व्हाट्सएप फक्त)

• ई-पत्ता- wordalaymediapublication@gmail.com

 

Join @ मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इत्यादी. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: