Site icon MarathiBrain.in

‘अवघड जीवनाची अवघड कहाणी’

अवघड जीवनाची काय व्यक्त करावी व्यथा?

जेथे जीवनच समस्येचा पसारा मांडतोय,

सुख एकीकडे दुःख एकीकडे, तमाशाच सर्वांचा

मेलेले मरून सुखी झाले, जो जगला तो आज मरण मागतोय

अवघड जीवनाची अवघड कहाणी…..!!

 

आभासी भासणारी, पण प्रत्यक्ष असणारी 

आज हसवणारी, उद्या रडवणारी 

पावलो पावली नेहमीच परीक्षा घेणारी 

अवघड जीवनाची अवघड कहाणी……!!

पहिल्या श्वासापासून ते अंतिम श्वासावर नेऊन सोडणारी 

जगातील सर्व अनुभव, याच आयुष्यात शिकविणारी 

जगणाऱ्याला तारणारी, मरणाऱ्याला मारणारी 

अवघड जीवनाची अवघड कहाणी…!!


स्वतःचे महत्त्व स्वतः अनुभवायला लावणारी  

समयीअंती, व्यक्तीनुरूप बदल घडविणारी 

माणसाला माणूसपणाची आठवण करून देणारी 

अवघड जीवनाची अवघड कहाणी…!!

 

स्वतः काहीच न बोलता, फक्त अनुभव देणारी 

भिकाऱ्याला मालामाल व श्रीमंताला गरीब बनविणारी 

प्रत्येकाला माय बापात देव शोधायला लावणारी 

अवघड जीवनाची अवघड कहाणी…!!  

 

:- अनुराग गडेकर

 @AnuragGadekar

 

◆◆◆

 

पाठवा तुमचे लिखाण writeto@marathibrain. com वर.

Exit mobile version