Site icon MarathiBrain.in

आधार क्रमांक माहित असला तरी पैसे काढता येणार नाही : युआयडीएआय

एखाद्या व्यक्तीचा आधार क्रमांक दुसऱ्याला माहित असल्यास तो/ती तय्च्या बँक खात्यातून पैसे तर काढणार नाही ना ? या प्रश्नावर युआयडीएआयने स्पष्टीकरण दिले आहे.

 

नवी दिल्ली, २३ सप्टेंबर

एखाद्याला तुमचा आधार क्रमांक माहित जरी असला, तरी त्याला तुमच्या बँक खात्यातून पैसे काढता येणार नाही असे, आधार प्रमाणन कंपनी युआयडीएआयने स्पष्ट केले आहे.

आधार कार्डच्या वापरावरुन नेहमीच अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचे बघतो.  त्यातच, सरकारने आधार सक्तीचे केल्यानंतर आधारच्या सुरक्षेबाबतही प्रश्न उद्भवले आहेत. त्यातीलच एक महत्वाचा प्रश्न म्हणजे, माझ्या आधार कार्डचा क्रमांक (नंबर) एखाद्याला माहित असल्यास तो/ती माझ्या बँक खात्यातून पैसे तर काढणार नाही ना ? या प्रश्नावर उत्तर देताना, तसे शक्य नसल्याचे युआयडीएआयने स्पष्ट केले आहे.

 

 

‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’ने तुमच्या बँक खात्यातून कुणालाही सहजासहजी आधार क्रमांकाचा वापर करून पैसे काढता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. युएडीएआयच्या डेटाबेसमध्ये केवळ न्यूनतम माहिती असते. आधारसाठी नामांकन करताना किंवा अद्ययावत (अपडेट) जेवढी माहिती ग्राहक देतात तेवढीच माहिती युआयडीएआयकडे असतो. दोन्ही डोळ्यांचे स्कॅन, चेहऱ्याचा फोटो, मोबाईल नंबर आणि ई-मेल यांचा त्यात समावेश आहे . त्यामुळे बँकिंग व्यवहार, विमा खाते किंवा इतर कुठलीही वैयक्तिक माहिती आधाराकडे नसल्याचे युएडीएआयने स्पष्ट केले आहे.

आधार अधिनियम २०१६ च्या कलम ३२ (३) अन्वये कुठल्याही सत्य माहितीला नियंत्रित, एकत्रित, अनुरक्षित अथवा सार्वजनिक करणे हे युएआयएडी आणि इतर संस्थांना प्रतिबंधित प्रतिबंधित आहे.

 

◆◆◆

 

पाठवा तुमचे लिखाण, तुमच्या परिसरातील घडामोडी writeto@marathibrain.com वर. 

Exit mobile version