Site icon MarathiBrain.in

खासदाराने कापला संसदेच्या प्रतिकृतीचा केक!

आग्रा, २३ सप्टेंबर

आग्र्याचे भाजप खासदार व अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष रामशंकर कठेरिया यांनी आज संसदेची प्रतिकृती असलेला केक कापला आहे. या कृतीमुळे समाज माध्यमांमधून त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून मोठा वाद निर्माण झाला आहे. समाजमाध्यमांवर (सोशल मिडिया) संसदेची प्रतिकृती असलेला केप कापत असतानाचा त्यांचा फोटो मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहे.

 

भाजपा खासदार संसदेची प्रतिकृती असलेला केक कापताना.  स्त्रोत

काल शुक्रवारी रामशंकर कठेरिया यांचा ५४  वा वाढदिवस होता. या निमित्ताने त्यांनी तब्बल ५४ किलोंचा केक कापला. या केकचा आकार संसदेच्या प्रतिकृतीच्या आकाराचा होता. केकवरील संसदेवर तिरंगादेखील लावण्यात आला होता. मात्र केक कापण्याआधी तो काढण्यात आला. संसद भवन, त्यासमोरील रस्ता, त्यावरुन जाणाऱ्या गाड्या, आसपासची हिरवळही या केकवर दाखवण्यात आली होती. कठेरिया यांनी केक कापल्यानंतर त्यांच्या एका समर्थकाने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

संसदेची प्रतिकृती असलेला केक कापल्याने सोशल मीडियावरुन कठेरियांवर सडकून टीका होत आहे. कठेरिया यांना राष्ट्रचिन्हाविषयीचे  आदर नाही. त्यामुळे त्यांनी अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. विश्व हिंदू परिषदेनेही क्ठेरीयांचा निषेध केला आहे व त्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी विहिंपणे केली आहे.

 

◆◆◆

 

पाठवा तुमचे लिखाण, तुमच्या परिसरातील घडामोडी writeto@marathibrain.com वर. 

Exit mobile version