Site icon MarathiBrain.in

गरीबरथ नाही, आता हमसफर !

नवी दिल्ली, ७ सप्टेंबर

गरीब व सर्वसामान्यांना स्वस्तात रेल्वेचा प्रवास करता यावा, यासाठी २००५मध्ये सुरू केलेल्या ‘गरीबरथ’ एक्सप्रेस गाड्या लवकरच बंद होणार आहेत. त्याऐवजी ‘हमसफर एक्स्प्रेस’ सुरू करण्याचे रेल्वेमंत्रालयाने ठरविले आहे. या एक्सप्रेसचे भाडे गरीबरथपेक्षा जास्त असेल.

या निर्णयामुळे गरिबांचा आरामदायी प्रवास बंद होणार असून त्यांना प्रवासासाठी जादा भाडे मोजावे लागू शकतात. आतापर्यंत गरीबरथ एक्स्प्रेसमधून कमी भाड्यात ‘थ्री टायर’ वातानुकूलित (एसी) डब्ब्यात प्रवास करता येत होते.

गरीबरथच्या डब्यांची दुरुस्ती करणे शक्य नसल्याने त्या बंद करण्याचा निर्णय मंत्रालयाने घेतल्याचे सांगण्यात आले आहे. या बदलाची सुरुवात दिल्ली-चेन्नई मार्गावर चालणाऱ्या गरीबरथ एक्स्प्रेसलया बंद करून होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्याने अन्य मार्गांवरील गरीबरथही बंद करण्यात येतील. याबाबतच्या सूचनाही रेल्वे बोर्डाने दक्षिण व उत्तर विभागाला दिलेल्या आहेत.

◆◆◆

Exit mobile version