Site icon MarathiBrain.in

ठळक घडामोडी | २० सप्टेंबर, २०१८

१. छत्तीसगड निवडणूक :

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी बहुजन समाज पक्ष करणार ‘जनता काँग्रेस छत्तीसगड’ सोबत युती. बसप ३५ तर जनता काँग्रेस लढणार ५५ जागांसाठी निवडणुक. जर जिंकलो, तर अजित जोगी होतील मुख्यमंत्री, अशी मायावतींनी घोषणा.

 

२. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतर्फे प्रहार, या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या स्वदेशी रणनीती मिसाईलची चाचणी लाँच कॉम्प्लेक्स, बालासोर केंद्रातून यशस्वीपणे पूर्ण.

 

३. २०१८ सालच्या राष्ट्रीय खेळ पुरस्कारांची घोषणा. देशातील विविध खेळातील खेळाडूंना २५ तारखेला प्रदान केले जाणार राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार ध्यानचंद पुरस्कार, अर्जुन पुरस्कार.

मीराबाई चानू आणि विराट कोहली ला राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार जाहीर.

 

४. भारतीय हवामान खात्याकडून येत्या १२ तासात ओडीसाच्या उत्तरी व आंध्रप्रदेशच्या दक्षिणी तटावर चक्रीवादळाचा इशारा.

 

५. मराठवाडा, खान्देश आणि मध्य-महाराष्ट्रातील बऱ्याच भागात २१ आणि २२ सप्टेंबर रोजी पाऊस पडेल, असा हवामान तज्ज्ञाचा अंदाज. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता.

 

◆◆◆

 

Exit mobile version