Site icon MarathiBrain.in

‘त्या चौघी’ देणार जगभर मातृत्वाचा संदेश !

मुलांच्या जडणघडणीत असलेले मातृत्व जगाला पटवून देण्यासाठी चार  मातांनी आरंभिलेल्या ‘मदर्स ऑन व्हिल्स’ या २२ देशांच्या प्रवासाला आजपासून सुरुवात झाली आहे. पुण्यातील शीतल वैद्य-देशपांडे आणि उर्मिला जोशी यांचा समावेश.

 

नवी दिल्ली, १० सप्टेंबर

मुलांना घडविण्यात ‘मातेची भूमिका व मातृत्वाचे महत्त्व ‘ असा संदेश जगभर देण्यासाठी  चार  मातांनी त्यांच्या ‘मदर्स ऑन व्हिल्स’ या प्रवासाला आज परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांच्या संमतीने सुरुवात झाली.

‘मदर्स ऑन व्हील्स’ या मातृत्वाच्या संदेश देणाऱ्या जगसफारीला आज सुरुवात

जवाहरलाल नेहरू भवनमध्ये आयोजित कार्यक्रमात श्रीमती स्वराज यांनी कोल्हापूर येथील ‘फाऊंडेशन फॅार होलिस्टीक डेव्हलपमेंट इन ॲकेडमीक फिल्ड’ या संस्थेच्या ‘मदर्स ऑन व्हिल्स’ उपक्रमात सहभागी चार महिलांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी या उपक्रमाची माहिती जाणून घेतली.  पुणे येथील शितल वैद्य-देशपांडे आणि ऊर्मिला जोशी, ग्वाल्हेरच्या माधवी सिंग व दिल्लीच्या माधुरी सहस्त्रबुद्धे, या चार महिलांचा या जगसफरीत समावेश आहे. श्रीमती स्वराज यांनी त्यांचे कौतुक केले आहे आणि उपक्रम व प्रवासासाठी  शुभेच्छा दिल्या आहेत. तत्पूर्वी रविवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या शासकीय निवासस्थानी या महिलांनी भेट दिली. तेव्हा त्यांनीही या महिलांना शुभेच्छा दिल्या.


● २२ देशांमधून प्रवास

मातृत्वाचा संदेश देणाऱ्या या महिलांनी आजपासून दिल्लीतून लाल रंगाच्या कारमधून प्रवासास सुरुवात केली आहे. ‘मदर्स ऑन व्हिल्स’ या उपक्रमांतर्गत येत्या ६० दिवसांमध्ये  एकूण २२ देशांचा प्रवास करून या महिला इंग्लडला पोहाेचणा.

२० हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या या प्रवासात मुलांच्या व्यक्तीमत्व विकासात मातेचे योगदान आणि मातृत्वाचे महत्त्व, या विषयांचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे.

 

◆◆◆

Exit mobile version