देशातील पहिल्या ‘फिरत्या पोटविकार उपचार केंद्रा’चे राज्यात उद्घाटन

पद्मश्री डॉ.अमित मायदेव यांच्या संकल्पनेतून साकारलेले देशातील पहिल्या ‘एन्डोस्कोपी ऑन व्हिल्स’ म्हणजेच फिरत्या पोटविकार उपचार केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. राज्यातील दुर्गम, आदिवासी व तसेच ग्रामीण भागातही गरीब पोटविकारग्रस्त लोकांना या फिरत्या केंद्रातून विविध सेवा-सुविधा व वैद्यकीय उपचार पुरवण्यात येणार आहेत.

 

ब्रेनवृत्त, मुंबई

दुर्गम, आदिवासी भागातील, तसेच ग्रामीण भागातील गरिबांना विविध पोट विकारांवर उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनातर्फे ‘एंडोस्कोपी ऑन व्हील्स’ या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. पद्मश्री डॉ. अमीत मायदेव यांच्या या संकल्पनेअंतर्गत देशातील पहिली ‘फिरती वैद्यकीय व्हॅन’ राज्ययाती गरीब आणि गरजू रूग्णांना पोट विकारावर अद्ययावत दर्जाचे उपचार देईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी दिली.

धकाधकीच्या या वर्तमान जगात पोटाचे विकार वाढत चालले आहेत. मात्र, पोटाच्या आजारांवर स्वस्त सेवा-सुविधा उपलब्ध नसल्या कारणाने दुर्गम, आदिवासी, तसेच ग्रामीण भागातील लोकांना नाईलाजाने शहरातील महागड्या रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे लोकांना उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सोयी-सुविधा मिळवून देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाकडून ‘एंडोस्कोपी ऑन व्हिल्सची’ या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. पद्मश्री डॉ. अमित मायदेव यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम उभा राहिला असून, आज या प्रकल्पाला सुरुवात झाली. याप्रसंगी उद्घाटक म्हणून राज्याचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. या उपक्रमाअंतर्गत भारतातील ‘पहिली फिरती वैद्यकीय व्हॅन’ राज्यातील गरीब आणि गरजू रूग्णांना पोट विकारावर अद्ययावत दर्जाचे उपचार देईल, असे या प्रकल्पाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

पद्मश्री डॉ.अमित मायदेव यांच्या संकल्पनेतून साकारलेले ‘एन्डोस्कोपी ऑन व्हिल्स’ केंद्र हे भारतातील पहिले केंद्र असून त्याची सुरुवात महाराष्ट्रातून होत आहे, ही बाब अभिमानास्पद आहे. संपूर्ण राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील गरीब, गरजूंना अद्ययावत दर्जाचे वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी हे फिरते वैद्यकीय केंद्र महाराष्ट्र शासन आणि बलदोटा इन्स्ट‍िट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आले असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी सांगितले. या फिरत्या केंद्रात अद्ययावत सोयी-सुविधांनी सज्ज ऑपरेशन थिएटर असून, 2 तज्ज्ञ डॉक्टर आणि टेक्निशिअन रुग्णांना वैद्यकीय सुविधा देतील. एच-पायलोरी, कॅन्सरचं लवकर निदान, आतड्यांचे अल्सर, बायोप्सी, आतड्यांना सूज आली असेल तर त्याचं निदान, ॲसिडिटीची तपासणी या केंद्राच्या माध्यमातून करण्यात येईल.

“रूग्णांचे निदान तत्काळ व्हावे आणि उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सोयी-सुविधा त्यांना मोफत मिळाव्यात या दृष्टीने एन्डोस्कोपी ऑन व्हिल्सची सुरूवात करण्यात आली असून वर्षभर ही व्हॅन राज्यभर फिरणार आहे”, असे डॉ.मायदेव यावेळी म्हणाले. विशेष म्हणजे या केंद्रातील संपूर्ण सुविधा विनामूल्य असणार आहेत. तसेच, पोटविकार होण्याची कारणे व त्यावरील उपाय आणि उपचार यांबाबत लोकांमध्ये या केंद्राच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. या गाडीचे प्रभारी म्हणून ग्लोबल रुग्णालयाचे संचालक डॉ.अमित मायदेव सर्व कामकाज पाहणार असून, तज्ज्ञ डॉक्टर म्हणूून मार्गदर्शनासाठी डॉ. मायदेव स्वत: गाडीवर उपलब्ध असतील.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: