Site icon MarathiBrain.in

बँकांना सलग पाच दिवस सुट्ट्या नाहीच!

मुंबई , ४ नोव्हेंबर

भाऊबीजेच्या दिवशी राष्ट्रीयकृत, सहकारी, आंतरराष्ट्रीय बँका सुरू राहणार असल्याची माहिती ‘महाराष्ट्र स्टेट बँक एम्ल्पॉईज फेडरेशन’चे सरचिटणीस देवीदास तुळजापूरकर यांनी दिली आहे.

भाऊबीजेच्या दिवशी बँकेचे व्यवहार सुरू राहणार असल्याचे महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशनने सांगितले आहे.

दिवाळी सणात सलग पाच दिवस बँक बंद राहणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून ऐकायला येत होत्या. ७ ते ११ तारखेपर्यंत बँक बंद असणार असल्याचे संदेश समाज माध्यमांतून फिरत होते. मात्र ते सर्व अफवा असल्याचे, महाराष्ट्र स्टेट बँक ऍम्प्लॉईज फेडरेशनचे सरचिटणीस देवीदास तुळजापूरकर यांनी सांगितले आहे. असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडव्याच्या सार्वजनिक सुट्यांमुळे ७ व ८ नोव्हेंबरला बंद राहणार आहेत. मात्र ९ नोव्हेंबरला भाऊबीजेच्या दिवशी बँकांचे सर्व व्यवहार सुरू राहणार असल्याची माहिती सरचिटणीसांनी दिली आहे.

येत्या ७ आणि ८ तारखेला दिवाळीनिमित्त बँकांना सुट्टी असणार आहे, तर १० नोव्हेंबरला दुसरा शनिवार आहे आणि ११ नोव्हेंबरला रविवार आहे. मात्र ९ तारखेला बँक सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

◆◆◆

Exit mobile version