प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलेल्या मराठी ‘बिग बॉस’च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली अभिनेत्री मेघा धाडे. ‘बिग बॉसच्या घरातले १०० दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय होते. अनेक वर्षांपासून मी बघितलेलं स्वप्न आज पूर्ण झालं, त्याचा खूप आनंद होतोय. मी हे पर्व जिंकलेय यावर माझा विश्वासच बसत नाहीय. या प्रवासामध्ये मी बऱ्याच गोष्टी शिकले. बरंच काही कमावलं आहे. या प्रवासामध्ये मला पुष्कर, सई आणि शर्मिष्ठा हे तीन जीवाभावाचे मित्र मिळाले’, अशी प्रतिक्रिया मेघानं त्यानंतर व्यक्त केली.
पुष्कर जोग आणि मेघा धाडे हे ‘टॉप २’ फायनलिस्ट ठरले होते. अखेर बाजी मारत मेघाच ‘बिग बॉस’ ठरली. १०० दिवसांत बिग बॉसच्या घरात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. अंतिम फेरीत मेघा धाडे, शर्मिष्ठा राऊत, आस्ताद काळे, स्मिता गोंदकर, पुष्कर जोग आणि सई लोकुर यांनी स्थान मिळवलं होतं. मेघानं ‘कसोटी जिंदगी की’, ‘कस्तुरी’, ‘झुंज’ या मालिकांमध्ये तर, ‘मॅटर’, ‘मान सन्मान’, ‘एक होती राणी’ आदी चित्रपटात काम केलं आहे.
सौजन्य: दैनिक महाराष्ट्र टाइम्स