Site icon MarathiBrain.in

यावर्षी साहित्याचा नोबेल नाही !

२०१८च्या नोबेल पारितोषिकांच्या तारखा जाहीर झाल्या असून, यावर्षी साहित्याचा नोबेल दिला जाणार नाही.  

 

स्वीडन, २९ सप्टेंबर

जागतिक स्तरावर सर्वात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या नोबेल परितोषिकाच्या यावर्षीच्या परितोषिकांची घोषणा येत्या १ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याचे स्वीडिश अकादमीने जाहीर केले आहे. मात्र यावर्षीच्या नोबेल परितोषिकांत साहित्याच्या नोबेलचा समावेश नसणार आहे.

नोबेल पारितोषिक प्रदान करण्याऱ्या स्वीडिश अकादमीकडून जाहीर करण्यात आले आहे की, २०१८च्या नोबेल पारितोषिकांमध्ये साहित्याच्या नोबेल पारितोषिकाचा समावेश नसणार आहे. यावर्षीच्या नोबेल परितोषिकांची तारखा जाहीर झाला असून, १ ते ८ ऑक्टोबर दरम्यान विविध क्षेत्रातील नोबेल पुरस्कारांची जाहीर घोषणा करण्यात येणार आहे. सर्वप्रथम सुरुवात वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिकाच्या घोषणेसह होऊन त्यानंतर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र शा विविध पुरस्करांची अनुक्रमे घोषणा होणार आहे.

नोबेल संस्थेचे कार्यकारी संचालक लार्स हैकेन्स्टिन यांनी साहित्याचा नोबेल यावर्षी का दिला जाणार नसल्याच्या एक प्रश्नावर उत्तर देताना सांगितले आहे की, स्वीडिश अकादमीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अस्थिरता निर्माण झाली असल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे.

हा २०१८ चा साहित्याचा नोबेल २०१९च्या साहित्याच्या नोबेलसोबत संयुक्तरित्या देण्याचाही विचार संस्थेने व्यक्त केला आहे.

 

◆◆◆

 

तुमचे लिखाण पाठवा आम्हाला writeto@marathibrain.com वर.

 

Exit mobile version