स्वीडनचे तिसरे मोठे शहर असलेल्या माल्मो येथील परिषदेत युरोपीय लोक व तेथील स्थलांतरितांना संबोधित करताना दलाई लामा बोलत होते.
एएफपी वृत्तसंस्था,
स्वीडन, १३ सप्टेंबर
‘युरोप हा युरोपीय लोकांचा प्रदेश आहे आणि स्थलांतरितांनी त्यांच्या देशाच्या विकासाठी त्यांच्या देशात परत जावे’, असे मत तिबेटीय धर्मगुरू दलाई लामा यांनी काल केले. स्वीडनचे तिसरे मोठे शहर असलेल्या माल्मो येथे आयोजित परिषदेत ते बोलत होते. माल्मो येथे स्थलांतरित लोक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत.
ते पुढे असेही म्हणाले की, आयुष्यातील संकटकांना तोंड देत असलेल्या स्थलांतरितांच्या संकटमसाठी नैतिकदृष्ट्या युरोप जबाबदार आहे. ‘ त्यांना येऊ द्या, मदत करा शिकवा… पण शेवटी त्यांनी त्यांच्या देशाचा विकास करायला हवा’, असे ८३ वर्षीय दलाई लामा म्हणाले.
स्थलांतरित लोकांनी त्यांच्या देशात का परत जावे, याचे कारण स्पष्ट करताना ते म्हणाले की, ‘ मला वाटते यूरोप हे यूरोपीय लोकांचे आहे. त्यांनी स्थलांतरितांना त्यांच्या ( मूळ देश) देशाचा विकास करण्यासाठी प्रोत्साहित करावे. शेवटी त्यांनाच हे करणे आहे.’
दलाई लामा यांना सन १९८९ चा शांततेचा नोबेल मिळालेला आहे. जगभरातील महापुरुषांच्याद्वारे प्रसंशीत व समर्थन असलेले दलाई लामा, स्वीडनमधील निवडणूक निकालांच्या तीन दिवसांनंतर एका परिषदेत नागरिकांना संबोधित करत होते. ही निवडणूक स्वीडनमधील अति उजव्या ‘ स्वीडन लोकशाही’ या पक्षाने जिंकली आहे.
◆◆◆