Site icon MarathiBrain.in

आयकर भरण्यासाठी आधार-पॅन जोडणी अनिवार्य

२०१९-२०साठी आयकर भरताना आधार क्रमांक व पॅन क्रमांक जोडणे आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात जाहीर केले आहे. 

 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली, ६ फेब्रुवारी

आयकर भरताना नागरिकांना आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक परस्पर जोडणे आवश्यक असल्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काल एक निकालात दिले आहेत. या निर्णयानंतर न्यायालयाने आयकर कायद्याच्या कलम १३९अअ ला कायम ठेवले आहे.

आयकर भरणा संबंधीच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने महत्त्वाचा आदेश जाहीर केला आहे. आयकर भरताना आधारकार्ड क्रमांक आणि पॅनकार्ड क्रमांक जोडावे लागणार असल्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती ए. के. सिक्री व न्या. ए. अब्दुल नाजीर यांच्या खंडपीठाने हे आदेश जाहीर केले आहेत. संबंधित याचिका ही उच्च न्यायालयात दाखल झाली होती. त्यावेळी उच्च न्यायालयाने त्याच्या निकालातून श्रेया सेन आणि जयश्री सातपुते यांचे आधार-पॅन लिंक नसले तरी त्यांना २०१८-१९ चा आयकर भरणा करण्यास परवानगी दिली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाना या निर्णयावर पुन्हा सुनावणी करणारा सन २०१९-२० साठी आयकर भरताना आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक जोडणे अनिवार्य असल्याचे सांगितले आहे. अन्यथा भरलेला आयटीआर गृहीत धरणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

 

◆◆◆

 

Exit mobile version