Site icon MarathiBrain.in

बाबा रामदेवांची ‘पतंजली झाली करमुक्त’ !

वृत्तसंस्था । आयएएनएस 

ब्रेनवृत्त । नवी दिल्ली


केंद्र शासनाने योगगुरू बाबा रामदेव यांच्या हरिद्वार येथील पंतजली विश्वस्त संस्थेला ‘संशोधन संघटने’चा (Research Association) दर्जा बहाल केला आहे. यामुळे आता या संस्थेला मिळणाऱ्या देणगीवर पुढील पाच वर्षांसाठी कोणताही प्राप्तिकर (Income Tax) आकारला जाणार नाही.

देशाच्या प्राप्तिकर विभागाने बाबा रामदेव यांच्या हरिद्वार स्थित पतंजली संशोधन विश्वस्त संस्थेला (Patanjali Research Foundation Trust) संशोधन संघटनेचा दर्जा देऊन पाच वर्षासाठी प्राप्तिकर भरण्यापासून सूट दिली आहे. यामुळे, संस्थेला मिळणाऱ्या देणग्यांचा वापर संशोधनासाठी वापरल्यास त्यावर प्राप्तिकर लागू होणार नाही. 

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) १२ जुलै रोजी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, केंद्र शासन हरिद्वार येथील पतंजली संशोधन विश्वस्त संस्थेला वैज्ञानिक संशोधनांसाठी ‘संशोधन संघटना’ म्हणून मान्यता देते.”

वाचा । जगभरातील कंपन्या घेणार ₹१०० अब्जाहून अधिकचे कर्ज!

ही अधिसूचना शासकीय राजपत्र प्रकाशित होण्याच्या तारखेपासून (म्हणजे सन २०२१-२२) लागू होईल आणि सन २०२२-२३ ते २०२७-२८ या कालावधीतील मूल्यमापनासाठी वापरण्यात येईल, असेही संबंधित अधिसूचनेत म्हटले आहे. अर्थात, पुढील पाच वर्षे संस्थेवर वैज्ञानिक संशोधनासाठी कोणतेही प्राप्तिकर आकारले जाणार नाही.

 


अशाच विविध विषयांवरील माहितीपूर्ण बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी भेट द्या www.marathibrain.in ला.

👉 फॉलो करा आम्हाला ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब, टेलिग्राम इत्यादींवर.

📧 ✒️ तुमचे लिखाण, प्रतिक्रिया व सूचना writeto@marathibrain.in वर नक्की पाठवा.

Exit mobile version