Site icon MarathiBrain.in

राममंदिराचे भूमिपूजन ५ ऑगस्टलाच होणार 

ब्रेनवृत्त | अलाहाबाद

येत्या ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत होणारा राममंदिराच्या भूमिपूजनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. भूमीपूजनाच्या कार्यक्रमावर बंदी घालण्यासाठी न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच, ही याचिका केवळ शंकावर आधारित असून, त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मात्र या भूमिपूजन कार्यक्रमाच्या आयोजकांना कार्यक्रमाच्या वेळी सामाजिक आणि शारीरिक अंतर राखण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले साकेत गोखले यांनी भूमिपूजनाचा कार्यक्रम थांबविण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. साकेत गोखले यांनी  दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, कार्यक्रमात सुमारे तीनशे लोक एकत्र येत आहेत. तसेच कोरोना संसर्गाच्या काळात भूमिपूजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करणे हे केंद्र शासनाच्या नियमाच्या विरोधात आहे. यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यताही जास्त आहे. त्यामुळे  राज्यशासनाने हा कार्यक्रम रद्द करावा.

राम मंदिरासाठी दान करणाऱ्यांना मिळणार प्राप्तिकरात सूट !

ही याचिका फेटाळल्यानंंतर आता अलाहाबाद उच्च न्यायालयाने भूमिपूजनाचा मार्ग मोकळा केला असल्यानेे सुमारे दीडशे वर्षाहून अधिक काळ वाट पहिल्यानंतर लोकांना या शुभ दिवसाची अनुभूती मिळणार आहे. तथापि, “या भूमिपूजनाचा कार्यक्रम ठरल्यानंतर बकरी ईद सारखे उत्सव  साजरे करण्यावर बंदी घालण्यात आली, परंतु राममंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम का घेतला जातोय”, असे अनेक प्रश्न विरोधी पक्षाने केंद्र शासनासमोर उपस्थित केले आहेेेत.

Exit mobile version