ब्रेनवृत्त | मुंबई
मुंबई उच्च न्यायालयाने आज (रविवारी) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १२ नोव्हेंबरपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या ताब्यात पोलिस कोठडी सुनावली आहे. काळा पैसा प्रतिबंध कायद्यांतर्गत असलेल्या विशेष न्यायालयाने १४ दिवसांची न्यायिक कोठडी सूनवल्यानंतर काल त्यांना शहरातील आर्थर रोड तुरुंगात आणण्यात आले .
मुंबई उच्च न्यायालयाने आज अनिल देशमुख यांची पोलीस कोठडी वाढवण्याआधी २ नोव्हेंबर रोजी त्यांना ६ तारखेपर्यंत चार दिवसांनी ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती.
तब्बल १२ तास चौकशी आणि शेवटी अटक!
sदमाजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लावलेल्या खंडणी व अवैध सावकारीच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना १ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती.
अनेक अवैध कार्यांसह मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटमधून सचिन वझे यांना ₹१०० कोटी जमा करण्यास बजवल्याचे आरोपही सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केले आहेत.
सहभागी व्हा👉मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा writeto@marathibrain.in