Site icon MarathiBrain.in

कोकण व प. महाराष्ट्रातील रस्ते दुरुस्तीसाठी शासनाकडून ₹१०० कोटींचा निधी!

ब्रेनवृत्त | नवी दिल्ली


कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या जीवघेण्या पावसामुळे वाहून गेलेल्या अथवा खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी केंद्र शासनाने 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सोबतच, रस्ते दुरुस्तीचे हे कार्य त्वरित सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली आहे.

संघ शासनाने मंजूर केलेल्या एकूण निधीपैकी 52 कोटी रुपये तात्पुरत्या डागडुजीसाठी आणि 48 कोटी रुपये कायमच्या दुरुस्त्या आणि बांधणीसाठी मंजूर करण्यात आले आहेत. गेल्या दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण जवळचा वशिष्ठी नदीवरचा पूल देखील खराब झाला होता. त्याची दुरुस्ती लगेच करुन 72 तासात तो पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, असेही गडकरी यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा 👉 चीनी कंपन्यांचा भारतीय महामार्ग प्रकल्पातील सहभाग संपुष्टात

सोबतच, परशुराम घाट, कारूळ घाट, आंबा घाट, इथे रस्त्यात आलेले अडथळे देखील दूर करण्यात आले आहेत. तात्पुरत्या दुरुस्तीची कामे आधीच हातात घेण्यात आली असून, कायमची दुरुस्ती करण्याचेही काम प्राधान्याने केले जाईल, असे आश्वासनही गडकरी यांनी दिले आहे. 

 

Join @ मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी www.marathibrain.in सोबत जुळून रहा ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Exit mobile version