Site icon MarathiBrain.in

फ्लिपकार्टच्या सीईओने दिला अचानक राजीनामा!

मराठी ब्रेन,

१३ नोव्हेंबर २०१८

फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बिन्नी बन्सल यांनी आज तडकाफडकी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक पातळीवर गैरव्यवहार केल्याचे आरोप त्यांच्यावर असल्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे कळते.

‘फ्लिपकार्ट’ या ई-कॉमर्स कंपनीचे सहसंस्थापक बिन्नी बन्सल यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून गंभीर गैरवर्तणुकीचे आरोप होत होते. त्यासंदर्भात फ्लिपकार्ट आणि वॉलमार्टकडून त्यांची स्वतंत्र चौकशी करण्यात आल्यानंतर बिन्नी बन्सल यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा दिला असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. वैयक्तिक पातळीवर घडलेल्या गैरव्यवहाराबद्दलचे आरोप बिन्नी यांच्यावर आहेत.

बिन्नी बन्सल यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर फ्लिपकार्ट आणि वॉल्टमार्टतर्फे संयुक्तरित्या बन्सल यांच्या राजीनाम्याविषयी एक नोटीसही जाहीर केले आहे.

स्रोत : ट्विटर 

गेल्या काही महिन्यांपूर्वी फ्लिपकार्टला वॉल्टमार्टने विकत घेतले आहे. यामुळे फ्लिपकार्टवर आता वॉलमार्टचे नियंत्रण आहेत. वर्तमान स्थितीत फिल्पकार्टचे ७७ टक्के मालकी हक्क वॉलमार्टकडे आहेत.

 

दरम्यान, बिन्नी बन्सल यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. वॉलमार्टने फ्लिपकार्ट खरेदी केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच बिन्नी यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप झाले आहेत.  त्यानंतर त्यांना पदाचा राजीनामा दिला त्यामुळे उद्योगक्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे.

बिन्नी यांनी राजीनामा दिल्याने फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचे कार्यभार आजपासून कृष्णमूर्ती सांभाळणार असल्याची माहिती वृत्तसंस्थांकडून मिळाली आहे.

 

◆◆◆

Exit mobile version