Site icon MarathiBrain.in

मुंबईकरांसाठी लुपिनची ‘जन कोविड हेल्पलाइन’

ब्रेनवृत्त, मुंबई 

राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना राज्यशासन युद्धपातळीवर उपाययोजना राबवत आहे. यात आता औषधनिर्माण क्षेत्रातील आघाडीच्या ‘लुपिन लिमिटेड’नेही उडी घेतली आहे. लुपिनने मुंबईतील रहिवाशांसाठी ‘मन का स्वास्थ्य, तन की सुरक्षा’ या उपक्रमा अंतर्गत ‘जन कोविड’ हेल्पलाइन’ (1800-572-6130) सुरू केल्याचे काल जाहीर केले आहे. लुपिनचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गुप्ता यांनी याबाबत माहिती दिली.

लुपिनने सुरू केलेल्या या उपक्रमाबाबत बोलताना गुप्ता म्हणाले, “आम्ही मुंबईतील रहिवाशांसाठी ही हेल्पलाइन सुरू करून, ‘कोविड-१९’शी लढण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. ‘जन कोविड हेल्पलाईन’ श्वसनविषयक आणि मानसिक लक्षणांची  यांची माहिती देणार आहे. लोकांना कोणताही सल्ला हवा असल्यास किंवा शंकांचे निरसन करायचे असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी या सेवेचा वापर करावा.”

मुंबईकरांच्या सेवेत देशातील पहिली ‘फिरती चाचणी बस’!

राज्यावर कोरोनाच सावट असताना डॉक्टर्स, पोलीस, स्वच्छता कर्मचारी, फार्मासिस्ट हे  सर्वजण युद्धपातळीवर काम करत आहेत. अशातच काही खासगी रुग्णालयेही बंद आहेत. त्यामुळे लॉकडाऊन च्या काळात  बऱ्याच लोकांना आपल्या डॉक्टरांना भेटणे शक्य होत नाही. यामुळे त्यांच्यावरील ताण वाढतो आहे. त्या दृष्टीने हा निर्णय लुपिनने घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे.

● ‘जन कोव्हिड हेल्पलाईन’ची कार्यपद्धती

‘जन कोविड हेल्पलाइन’च्या उपक्रमातून ‘कोविड-१९‘ विषयीच्या शंका, लक्षणे, जवळच्या चाचणी केंद्रांचा किंवा सरकारी रुग्णालयांचा तपशील नागरिकांपर्यंत पोहोचवला जाईल.  तसेच, जर कोणाला ताण, चिंता किंवा मानसिक आरोग्याच्या  समस्या असतील, तर त्या लोकांनाही योग्य मार्गदर्शन आणि मदत केली जाईल.  त्याचबरोबर, जनरल फिजिशिअन, मानसशास्त्रज्ञ, रेस्पिरेटरी फिजिशिअन व मानसशास्त्रज्ञ (सायकॉलॉजिस्ट) यांची टीम मोफत सल्ला-सेवा देणार असून, ‘कोविड-19’ विषयी असलेल्या शंकांची उत्तरे देणार आहे. ही सेवा मराठी, हिंदी, गुजराती व इंग्रजी अशा चार भाषांमध्ये दररोज सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत उपलब्ध असणार आहे.

◆◆◆

Exit mobile version