ब्रेनवृत्त । मुंबई
येत्या १ नोव्हेंबरपासून राज्यात संपूर्ण महिनाभर मतदार जागृती अभियान राबविण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मतदानाचा हक्क बजवण्याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तसेच नव्या मतदारांची नोंदणी करण्यासाठी हे अभियान राज्यभर राबवले जाईल.
राज्यात १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत राबवल्या जाणाऱ्या या मतदान जागृती अभियानांतर्गत वयाची १८ पूर्ण झालेल्यांना मतदार नोंदणी करता येणार आहे. “१८ वर्षे पूर्ण झालेल्या तरूणांना मोबाईलवरून नोंदणी करता यावी यासाठी सुविधा केंद्रे उपलब्ध करून देण्यात येतील”, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.
राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र : विरोधकांच्या मुद्द्यांवर निर्णय घ्या!
महानगरपालिका आणि स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात होण्यासाठी पालिका व स्वराज्य संस्थांच्या प्रशासनाने जनजागृती करण्यावर भर द्यावा. नवमतदारांनी नोंदणीसाठी स्वत:हून सहभाग घ्यावा. तसेच, यासाठी प्रशासनाने विशिष्ट बोधवाक्यांचा उपयोग करणाच्या सूचना मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज झालेल्या बैठकीत केल्या.
१ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत मतदार जागृती अभियान राबविणार. १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरूणांना मोबाईलवरून नोंदणी करता यावी यासाठी सुविधा केंद्रे उपलब्ध करून देण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे निर्देश. pic.twitter.com/bjCGv5CY24
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 13, 2021
कोकण व प. महाराष्ट्रातील रस्ते दुरुस्तीसाठी शासनाकडून ₹१०० कोटींचा निधी!
राज्यभर मतदान जागृती अभियान यशस्वीपणे पार पाडण्याचे निर्देशही देशपांडे यांनी संबंधित यंत्रणांना व स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. “नवमतदारांना आवाहन करण्यासाठी समाजमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या संस्थांनाही अंतर्भूत करण्यात यावे. यासाठी माहितीपत्रके तयार करून त्यांचा समाजमाध्यमाद्वारे जास्तीत जास्त प्रसार करण्यात यावा”, असेही श्रीकांत देशपांडे म्हणाले.
सहभागी व्हा👉मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in