Site icon MarathiBrain.in

युतीत फूट ; एमआयएम लढणार स्वबळावर !

मुंबई, ६ सप्टेंबर

नुकत्याच एप्रिल-महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत एकत्र लढलेल्या एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात विधानसभेपूर्वीच फूट पडली आहे. आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा एमआयएमने केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमला आठपेक्षा अधिक जागा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेत असल्याचे आज औरंगाबादचे खासदार व एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी जाहीर केले आहे. इम्तियाज जलील यांनी पत्रक काढून आघाडीतून बाहेर पडल्याचे जाहीर केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून विधांसभेच्या निवडणुकांआधीच एमआयएमकडून वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत मिळत होते. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सन्मानपूर्वक वागणूक दिली नाही. त्यांनी फक्त आठ जागांची ऑफर दिली, जी कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही. सोबतच, या यादीत औरंगाबाद मतदारसंघाचाही समावेश नाही. त्यामुळे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे एमआयएमने स्पष्ट केले आहे. एमआयएमचे आज राज्यभरात दीडशेपेक्षा जास्त नगरसेवक आहेत, असेही एमआयएमच्या या पत्रकात म्हटले आहे.

एमआयएमचे आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात जागा वाटपाबाबत शेवटची बैठक ५ सप्टेंबरला झाली होती. प्रकाश आंबेडकरांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना मेल लिहून 8 जागा देत असल्याचे सांगितले होते.

 

◆◆●

Exit mobile version