ब्रेनवृत्त | नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांवरच बोचरी टीका केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना अर्थशास्त्रच कळत नाही, असे सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले आहेत.
उत्तरप्रदेश राज्यात एक दिवसीय दौऱ्यावर असताना भाजपचे जेष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांच्या आर्थिक ज्ञानावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. देशाचे पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांना अर्थशास्त्राचे ज्ञान नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. देशातील वाढत्या महागाईसाठी अर्थमंत्रीच जबाबदार असल्याचे स्वामी म्हणाले. देशाचे वित्त मंत्री कुणाचीही विचारपूस न करता स्वमर्जीने सर्व निर्णय घेतात, असेही ते म्हणाले.
वाचा । विकास दर कमी, मात्र देशात आर्थिक मंदी नाही : अर्थमंत्री सीतारामन
राजकीय दौऱ्यावर असलेले स्वामी माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले, की शासनाला अर्थशास्त्राची जाणीव मुळीच नाही. विकास दरात घट आल्यानंतर कोणते पाऊल उचलावे हेही अर्थमंत्र्यांना माहिती नाही.
माध्यमांशी बोलताना त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही एक टिप्पणी केली आहे. ते म्हणाले, की काही हिंदुत्ववादी समूहाच्या म्हणण्यानुसार काही असे पवित्र स्थळ, जिथे आधी हिंदू पुजा स्थळ होते, तिथे आता मशिदी बांधल्या आहेत. खासदार स्वामी एवढ्यावरच न थांबता पुढे म्हणाले, की पवित्र स्थळ विशेष तरतूद अधिनियम, 1991 निरस्त करण्यासंबंधी दाखल केलेल्या माझ्या याचिकेचे उत्तर शासनाने अजूनपर्यंत दिलेले नाही.
सहभागी व्हा👉मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in