Site icon MarathiBrain.in

मसूद अजहरची पाककडून गुपचूप सुटका!

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरची पाकिस्तानने तुरुंगातून गुपचूप सुटका केली असल्याचे वृत्त समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित झाल्यावर पाकिस्तानने जरी त्याच्यावर कारवाई केली असली, तरी भारतात अशांतता पसरवण्यासाठी पाकने त्याची सुटका केल्याची माहिती गुप्तचर संघटनेने केंद्र सरकारला दिली आहे.

हेही वाचा : दहशतवाद सर्वात मोठा धोका : पंतप्रधान मोदी

हिंदुस्थान टाइम्सने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार पाकने मसूद अझहरची गुपचूप सुटका केल्याची माहिती गुप्तचर संघटनेने शासनाला दिली आहे. गुप्तचर संघटनेच्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याच्या विरोधात सियालकोट-जम्मू आणि राजस्थानमध्ये येणाऱ्या काळात पाकिस्तान दहशतवादी कारवाया घडवून आणण्याच्या तयारीत आहे. याचाच एक भाग म्हणून राजस्थान सीमेजवळ अतिरिक्त पाकिस्तानी सैन्य तैनात करण्यात येत आहेत. यासंदर्भात गुप्तचर यंत्रणांनी सरकारला सावध केेले आहे. तसेेेच, भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी पाकने मसूद अजहरची तुरुंगातून सुटका केली आहे, अशी माहितीही गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. सोबतच, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि जवानांना अलर्ट राहण्याच्या सूचना देेण्यात आल्या आहेत.

पाकिस्तान अजूनही तसाच : इमन गंभीर

अजहर हा 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले होते. संयुक्त राष्ट्रसंघाने अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणूनही घोषित केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या निर्णयाचे स्वागतही करण्यात आले होते. यानंतर पाकने मसूदवर कारवाई करत त्याला तुरुंगात टाकले होते. मात्र, आता पाकने त्याच अजहरची गुपचूपरित्या सुटका केली असेल्याची धक्कादायक बातमी समोर आहे.

 

◆◆◆

Exit mobile version