Site icon MarathiBrain.in

‘पवारसाहेब’ काँग्रेससोबत असल्याची पंतप्रधानांना खंत !

ज्या पक्षाने पवार साहेबांचा अपमान करन  बाहेर काढले, त्याच काँग्रेस पक्षाच्या सोबत ते आजही आहेत याची खंत पंतप्रधान मोदी यांनी काल व्यक्त केली.

 

पीटीआय

नवी दिल्ली, २३ जानेवारी 

ज्या पक्षाने पवार साहेबांचा अपमान करन  बाहेर काढले, त्याच काँग्रेस पक्षाच्या सोबत ते आजही आहेत याची खंत वाटते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले.

शदर पवार अजूनही काँग्रेससोबत असल्याची खंत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली

‘मेरा बूथ, सबसे मजबुत’ या उपक्रमाच्या निमित्ताने व लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काल महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. गडचिरोली, हिंगोली, नांदेड आणि नंदुरबार जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांशी व्हिडीओ काँफेरेन्सच्या माध्यमातून ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी सहानुभूती दर्शवत काँग्रेसवर निशाण साधला. अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या तंबूत शरद पवार अजूनही आहेत यावर त्यांनी खंत व्यक्त केली.

“शरद पवार साहेबांनी जनतेसाठी काम केले. आपल्याला पवार साहेबांबद्दल आदर आहे. मात्र साहेबांची एवढीच चूक झाली की, ज्या पक्षाने ऐन पक्षाध्यक्ष होण्याच्या वेळी त्यांच्या अपमान करू  बाहेरचा रस्ता दाखवला त्या पक्षासोबत शरद पवार अजूनही आहेत. याची खंत वाटते”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

संपूर्ण संवादादरम्यान मोदींनी पवारांवर टीका करणे टाळले व त्यांच्याबद्दलचा ‘सॉफ्ट कॉर्नर’ दर्शवत उलट काँग्रेसलाच धाब्यावर धरले. विशेष म्हणजे, याआधी दोनदा बारामतीत येऊन गेले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ज्येष्ठ नेते पवार यांचे बोट धरून राजकारणात आल्याचे सांगत पवार यांच्यासोबतचे मैत्रीचे संबंध जाहीर केले होते.

 

◆◆◆

Exit mobile version