राज्याचे सध्याचे विदारक चित्र बदलणे, ही माझी नैतिक जबाबदारी : शरद पवार

ब्रेनवृत्त, महाराष्ट्र

०८ ऑक्टोबर

ज्या राज्याने मला खुपकाही दिलं अशा महाराष्ट्राचे  आजचे विदारक चित्र बदलण्याची माझी नैतिक जबाबदारी असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राज्यातील बेरोजगारी, शेती, व्यवसाय, पक्षातील दिग्गजांनी पक्ष सोडून जाणे, अशा अनेक मुद्यांवर भाष्य केले.

प्रतिनिधिक छायाचित्र

“आज महाराष्ट्राची काळजी वाटते. महाराष्ट्रातील जनतेनंं 4 वेळा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा मााझ्या हाती सोपवली, केंद्रातही नेतृत्व करण्याची संधी दिली. या महाराष्ट्राने मला खूप काही दिले आहे. त्यामुळे मी राज्यातील जनतेचं काही देणं लागतो. आज राज्यातील शेती, उद्योग अडचणीत आहेत, बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे राज्याचे आजचे असे विदारक चित्र बदलण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे”, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

पालकमंत्री फुके यांनीच मला फसवण्याचे षडयंत्र रचले : आमदार चरण वाघमारे

एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी पवारांनी राज्यातील बेरोजगारी, शेती व्यवसाय, पक्षातील दिग्गजांनी पक्षाची साथ सोडणे, अशा अनेक मुद्यांवर भाष्य केले. “मध्यंतरीच्या काळात अनेकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. परंतु यातून मला नवे नेतृत्व तयार करण्याची संधी मिळाली. नव्या नेतृत्वाला उत्साहित करण्याची जबाबदारी मी घेतली, त्यामुळे नवीन नेतृत्त्व नक्कीच चांगले काम करतील. त्यांच्या कामावर विश्वास आहेच, परंतु त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मी सहभाग घेत आहे ”, असे शरद पवार या मुलाखतीत म्हणाले.

पवारसाहेब’ काँग्रेससोबत असल्याची पंतप्रधानांना खंत!

सोबतच, गेल्या पाच वर्षांपासून पक्षाने उचलून धरलेल्या विषयांमुळे त्यांचे सकारात्मक परिणाम निवणुकीत दिसतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. “गेल्या पाच वर्षांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक विषय उचलून धरलेत व आक्रमक भूमिकाही घेतल्या आहेेेत. या सर्वांचे सकारात्मक परिणाम या निवडणुकांमध्ये दिसतील. साधन संपत्ती या गोष्टींमध्ये विद्यमान सरकार हे प्रचंड शक्तीशाली आहे. ईडी, सीबीआयचा सातत्याने वापर करून दहशतीचे वातावरण तयार करण्याचं काम त्यांच्याकडून केले जात आहे. त्यामुळे आम्हाला मदत करणारे लोकही दूर जात आहेत”, असेही ते म्हणाले.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: