Site icon MarathiBrain.in

अमरावती विद्यापीठात जलशक्ती चित्ररथाचे उद्घाटन

ब्रेनवृत्त | अमरावती

केंद्र शासनाच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो व राष्ट्रीय सेवा योजना, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या सहकार्याने जलशक्ती अभियानावर आधारित चित्ररथाचे उद्घाटन विद्यापीठाच्या विद्यार्थी भवनाच्या प्रांगणात विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते काल करण्यात आले.

छायाचित्र स्रोत : पत्र सूचना कार्यालय

चित्ररथाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. चांदेकर म्हणाले की, जलशक्ती चळवळीमध्ये फक्त सहभागी न होता, आचरणातून ही समस्या सोडवायची आहे.निसर्गाचे सौंदर्य टिकवण्यासाठी पाण्याची बचत आवश्यक असून, प्रत्येकाला यासाठी स्वतःची जबाबदारी समजून पुढाकार घ्यायला हवा. तर याप्रसंगी उपस्थित क्षेत्रीय प्रचार अधिकारी इंद्रवदनसिंह झाला त्यांच्या प्रास्ताविकात म्हणाले की, “पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी, तसेच भारत सरकारच्या जलशक्ती अभियान चळवळीत सहभागी होण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील अमरावती मनपा क्षेत्र, चांदूर बाजार आणि अचलपूर या भागात जलदूत (फिरते वाहन) फिरवण्यात येणार आहे.”

जलशक्ती चित्ररथाच्या उद्घाटन कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना जल प्रतिज्ञा देण्यात आली. जलदूतची निर्मिती प्रादेशिक परिवहन विभागाच्या सहकार्याने पुणे येथील केंद्र सरकारच्या रिजनल आउटरिच ब्यूरोद्वारे जलदूत चित्ररथाच्या निर्मिती करण्यात आली आह. या चित्ररथात जलसंरक्षण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पारंपारिक जलस्त्रोताचे नूतनीकरण, पाणलोट क्षेत्रविकास कार्यक्रम, घनदाट जंगल निर्मिती आणि देशातील सध्याची जलस्थिती या विषयांवर चित्र, संदेश फलक, ऑडिओ-व्हिडिओ इत्यादी माध्यमांद्वारे माहिती देण्यात आली आहे.

उद्घाटनानंतर हे चित्ररथ विद्याभारती महाविद्यालय, श्री गणेशदास राठी शाळा, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, विभागीय शासकीय ग्रंथालय, प्रा. राम मेघे अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय आणि बस डेपो या मार्गांवर फिरणार आहे. यावेळी प्रभारी कुलगुरु डॉ. राजेश जयपूरकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, ‘रासेयो’चे संचालक डॉ राजेश बुरंगे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी श्री इंद्रवदनसिंह झाला आणि जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदूरकर आदि मान्यवर उपस्थित होते

 

(माहिती व छायाचित्र साभार : पत्र सूचना कार्यालय)

◆◆◆

 

तुमच्या परिसरातील घडामोडी आणि उपक्रमांबद्दल आम्हाला कळवा थेट ई-मेलने. मेल करा : writeto@marathibrain.com वर

Exit mobile version