राज्यात बिगर लाल विभागांमध्ये (Non-Red Zones) केसकर्तनालयांना सुरू करण्याच्या परवानगीसह इतर काही गोष्टींना परवानगी दिली आहे, तर लाल विभागांमधील नियम जवळपास सारखेस आहेच. जाणून घ्या ‘टाळेबंदी ४.०’ (Lockdown 4.0) अंतर्गत राज्यात काय सुरू आणि काय बंद ? याविषयी.
ब्रेनवृत्त, मुंबई
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाने टाळेबंदी ४.० (लॉकडाऊन) जाहीर केली. मात्र, या चौथ्या टप्प्यातील नव्या नियामावलीत लाल व्यतिरिक्त इतर विभागांत (Zone) केसकर्तनालये (Saloon) करण्यास परवानगी दिली आहे. तसेच, सलून सुरु केल्यानंतर मास्क, हँड सॅनिटायझरबाबतचे नियम आणि कोरोना संदर्भातील अटी-शर्थींचे पालन करणे नाभीकांना बंधनकारक असणार आहे. सलून सुरु करण्याला परवानगी दिल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून दाढी-केस कापण्यासाठी वाट पाहणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
नव्या नियमावलीनुसार सलूनमध्ये सामाजिक अंतराचे (सोशल डिस्टन्सिंग) नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून केसकर्तनालये बंद असल्याने सलून व्यावसायिकांना मोठा फटका बसला होता. अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. काही नाभिक संघटनांनी अटी-शर्थींसह केसकर्तनाची उघडण्याची परवानगी मिळावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती देखील केली होती.
दरम्यान, राज्यात लाल (Red), नारंगी (Organge) आणि हिरवे (Green) विभाग नव्याने आखल्यानंतर हिरव्या आणि नारंगी विभागांमध्ये सलून सुरु करण्याला परवानगी दिली होती. मात्र, स्थानिक प्रशासनाने तेथील संसर्गाच्या परिस्थितीनुसार निर्णय घेतल्याने अनेक ठिकाणी सलून बंदच होते. ‘लॉकडाऊन ४.०’ मध्ये आता कोणताही निर्णय घेताना स्थानिक प्रशासनाला मुख्य सचिवांच्या परवानगीचे बंधन घालण्यात आले आहे. त्यानुसार, राज्य शासनाने काढलेल्या आदेशाशिवाय किंवा त्याच्या विपरित कोणतेही आदेश काढायचे असल्यास स्थानिक प्रशासनाला मुख्य सचिवांची परवानगी घ्यावी लागणार आहे.
● बिगर लाल विभागमधील (Non-Red Zone) नियम कोणते ?
– बिगर रेड झोनमधील केसकर्तनाची दुकाने सुरु करण्यास परवानगी
सर्व दुकाने आणि बाजारपेठा सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत सुरू राहतील, मात्र गर्दी झाल्यास ती बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेऊ शकते.
– आंतरजिल्हा बससेवा 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यास परवानगी
– खेळाची ठिकाणे, स्टेडियम, खुल्या जागा वैयक्तिक व्यायामासाठी सुरू राहतील, पण समूह जमावाला बंदी
राज्य पातळीवर काढलेल्या आदेशांची अंमलबजावणी न करता स्थानिक प्रशासन आपल्या स्तरावर वेगळे आदेश आणि निर्णय घेत असल्याने गोंधळाची निर्माण होऊ शकतो. हा गोंधळ होऊ नये म्हणून आता कोणताही निर्णय घेताना मुख्य सचिवांच्या परवानगीचे बंधन घालण्यात आले आहे.
हेही वाचा : चौथ्या टाळेबंदीत महत्त्वाची ठरतील शासनाची ९ मार्गदर्शक तत्त्वे
● ‘रेड झोन’मध्ये काय सुरू राहणार ?
– अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने
– टॅक्सी, रिक्षा सेवा बंद राहणार
– चार चाकीमध्ये १+२ आणि दुचाकीवर एकालाच परवानगी
– स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली तर दारूची दुकाने सुरू करता येणार
– दस्त नोंदणी कार्यालय, आरटीओ कार्यालय सुरू करण्याची परवानगी
– विद्यापीठ, महाविद्यालयात उत्तरपत्रिका तपासणी, निकाल लावण्यासाठी ५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला परवानगी
– मॉल्स, परवानगी नसलेली दुकाने आणि इतर आस्थापने साफसफाईसाठी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळात सुरू ठेवू शकतात
● रेड झोनमध्ये काय बंद राहणार ?
– शाळा- महाविद्यालये हॉस्पिटल, हॉटेल, मॉल, प्रार्थनास्थळे बंदच राहणार.
– आंतरराज्य रस्ते वाहतूक बंदच राहणार
– ट्रेन, मेट्रो, विमान सेवा सर्वच झोनमध्ये बंद राहणार
◆◆◆