प्रतिनिधी, गोंदिया
दि.११ ऑक्टोबर
जिल्ह्यातील तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, रिपाइं आणि पी. री पा. या महागठबांधनाचे अधिकृत उम्मेदवार रविकांत खुशाल बोपचे यांच्या प्रचाराकरीता राष्ट्रवादीचे काँग्रेसचे स्टार प्रचारक व खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या प्रचारसभांचे आज दिवसभर ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे विद्यमान आमदार विजय रहांगडाले आणि महाघाडीकडून उभे असलेले माजी खासदार खुशाल बोपचे यांचे सुपुत्र रविकांत बोपचे यांच्यात खरी रंगत असणार आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वांपैकी असलेले खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पूर्व विदर्भात महाआघाडीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. शरद पवारांच्या उजवा हात मानले जाणारे पटेल हे महाआघाडीचे स्टारप्रचारक असून तिरोडा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. भाजपचे विद्यमान आमदार विजय रहांगडाले यांना भाजपने परत तिकीट दिल्यानंतर भाजपचे माजी खासदार खुशाल बोपचे यांचे सुपुत्र राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेऊन निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यानिमित्ताने आता दोघांपैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले असताना, महाआघाडीचे स्टार प्रचारक प्रफुल्ल पटेल यांनी आपला प्रचारदौरा सुरू केला आहे.
पालकमंत्री फुके यांनीच मला फसवण्याचे षडयंत्र रचले : आमदार चरण वाघमारे
मागील सर्व निवडणुकामधील चुका सुधारण्याच्या निर्णय त्यांनी घेतला असून, यावेळी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचा झेंडा फडकविण्यासाठी तिरोड्यावर खास नजर पटेलांनी ठेवली आहे. त्यानिमित्ताने त्यांचा आज प्रचारदौरा सुरू होतो आहे.
● पटेल यांच्या प्रचारदौऱ्याची रूपरेषा
खा.पटेल शुक्रवारला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रविकांत बोपचे यांच्या प्रचाराकरीता सकाळी 11.30 वाजता धापेवाडा, दुपारी 12.30 वाजता सेजगाव, दुपारी 2.30 वाजता एकोडी आणि दुपारी 3.30 वाजता बेरडीपार येथील माता चौकात सभा आयोजित करण्यात आली आहे.
महायुतीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात ‘सामाजिक परिवर्तन’ : रामदास आठवले
त्यानंतर, सायकांळी 4.30 वाजता तिरोडा येथील साई प्लाजा काॅम्पलेक्समध्ये पक्षाच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन पटेलांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर, परत सायकांळी 6.30 वाजता ठाणेगाव आणि रात्री 7.30 वाजता वडेगाव बाजार चौक येथे आयोजित सभांना ते मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे, माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन,काँग्रेस प्रदेश सचिव डाॅ.योगेंद्र भगत यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार आहेत.
◆◆◆