Site icon MarathiBrain.in

मेट्रोसाठी आरे संकुलातील वृक्षतोडीला शिवसेनेचा नकार कायम

मुंबई , १४ ऑगस्ट

शहरातील आरे संकुलात प्रस्तावित मेट्रो करशेड बनवण्यासाठी तेथील सुमारे २२३८ झाडे तोडण्याच्या परवानगीचा प्रस्ताव शिवसेनेने प्रशासनाकडे परत पाठवला आहे. यावर आता अंतिम निर्णय हा वृक्ष प्राधिकरणाच्या सदस्यांनी पाहणी केल्यावर २० ऑगस्टला होणार आहे.

गोरेगाव पूर्व येथील आरे संकुलाच्या परिसरातील सुमारे साडेतीन हजार वृक्ष मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेडमुळे बाधीत होणार आहेत. यांपैकी २२३८ झाडे तोडण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मांडण्यात आला होता. त्यावेळी शिवसेनेने या प्रस्तावास विरोध दर्शविला होता. सोबतच, वृक्ष प्राधिकरणामध्ये तज्ज्ञांचा समावेश नसल्याने उच्च न्यायालयाने प्राधिकरणाला कोणताही निर्णय घेण्यास २०१८ मध्ये मनाई केली होती.

न्यायालयाच्या आदेशानुसार प्राधिरणाने पाच तज्ज्ञांची नियुक्ती केल्यानंतर वृक्ष प्राधिकरणाची पहिली बैठक काल मंगळवारी घेण्यात आली. यावेळी मेट्रो कारशेडसाठी वृक्ष तोडण्याच्या प्रस्तावाला शिवसेनेने  विरोध कायम ठेवला आहे. हजारो झाडांची कत्तल करू देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने या बैठकीत घेतली आहे. दरम्यान, राज्यात सत्तेवर एकत्रित असल्याने भाजपच्या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पामुळे होणाऱ्या वृक्षांच्या कत्तलीला विरोध करायचा  की नाही? हा प्रश्न शिवसेनेपुढे निर्माण झाला होता. सोबतच, विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्षाच्या भूमिकेत बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दुुुसरीकडेे, आरे संकुलातील हजारो झाडे तोडण्याबाबत पालिकेने मुंबईकरांकडून हरकती-सूचना मागवल्या होत्या. त्यावर नागरिकांकडूून ८० हजार तक्रारी-सूचना प्राप्त झाल्या होत्या. या सूचनांचे प्रशासनाने काय केले? मुंबईत कारशेडसाठी पर्यायी जागा उपलब्ध असताना आरेमधी  जागेेचाच अट्टहास का? या ठिकाणच्या २७ आदिवासी पाड्यांचे पुनवर्सन कुठे करणार? अशा विविध प्रश्नांची लेखी उत्तरे प्रशासनाने पुढील बैठकीत द्यावी, अशी मंगळवारी झालेल्या बैठकीत करण्यात आली आहे.

 

◆◆◆

Exit mobile version