प्रतिनिधी, सोलापूर
सद्यस्थितीत महाराष्ट्रातील विरोधी पक्षांची स्थिती पाहता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार कार्यायल्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
काल बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करताना सुशीलकुमार शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची गरज व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, ” शरद पवार हे वयाच्या ८० व्या वर्षीही पक्षाला वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता माझेही वय झाले आहे, आम्ही थकलो आहोत. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची गरज आहे.” शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी टीकेची झोड उठविली, तर इतर पक्षांकडूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
शिंदेच्या संबंधित वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. साठे म्हणाले की, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एक झाल्यास ताकद वाढेल हे खरे. विलीनीकरणाबाबत सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलेली भावना चांगली आहे. पण ज्या मुद्यावरून शरद पवार बाहेर पडले, त्यामुळे हे मान्य होणे कठीण वाटते.
त्या फुटलेल्या आमदारांना भाजपचे मंत्रीपदही ?
दरम्यान, शिंदे पुढे असेेेही म्हणाले की, हे वक्तव्य माझे वैयक्तिक असून, सत्ताधाऱ्यांविरूद्ध लढा देण्यासाठी आम्ही अजून जवान आहोत. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष बळकट होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण झाले, तर आमची ताकद वाढेल, असे आजही मला वाटते.
◆◆◆