Site icon MarathiBrain.in

अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या मानधनात वाढ

अंगणवाडी सेवकांच्या मानधनात जवळपास ₹१५०० ची वाढ, तर आशा कार्यकर्त्यांच्या दैनिक भत्त्यास दुप्पट करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केली आहे.

 

नवी दिल्ली, ११ सप्टेंबर

अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केली आहे. यामुळे ज्या अंगणवाडी सेवक-सेविकांना आधी ₹ ३००० मानधन मिळायचे ते वाढून आता ₹४५०० होणार आहे आणि ज्यांचे मानधन ₹२००० आहे ते वाढून ₹३५०० होणार आहे. सोबतच अंगणवाडी सहाय्यकांच्या मनधनातही वाढ करण्यात आली अजून ₹ १५०० वरून ते आता ₹२२५० होणार आहे.

आशा स्वयंसेविकांच्या दैनंदिन भत्त्यातही वाढ करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. केंद्र शासनाद्वारे दिल्या आशा सेविकांना नित्यक्रमाणे दिल्या जाणाऱ्या भत्त्यात शंभर टक्क्यांनी वाढ करून, ते आता दुप्पट होणार आहे. यासोबतच सर्व आशा स्वयंसेविका व त्यांच्या सहाय्यकांना शासनातर्फे मोफत विमा संरक्षण दिले जाणार आहे. हे विमा संरक्षण प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजने अंतर्गत दिले जाणार आहे.

‘पोषण महिन्या’ अंतर्गत येणाऱ्या पोषण अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृष्य प्रणालीमार्फत आरोग्य कर्मचारी, आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.

 

◆◆◆

Exit mobile version