Site icon MarathiBrain.in

अ‍ॅना बर्न्‍स ठरल्या यंदाच्या ‘मॅन बुकर’

उत्तर आयर्लंडच्या ५६ वर्षीय लेखिका अ‍ॅना बर्न्‍स यांना  ‘मिल्कमन’ या अनुवादित कादंबरीला यावर्षीचा ‘आंतरराष्ट्रीय मॅन बुकर’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

 

लंडन, १७ ऑक्टोबर

इंग्रजी साहित्यविश्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘आंतरराष्ट्रीय मॅन बुकर पुरस्कार’ यंदा आयर्लंडच्या लेखिका अ‍ॅना बर्न्‍स यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या ‘मिल्कमन’ या कादंबरीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

इंग्रजी साहित्यविश्वात मानाच्या मानल्या जाणाऱ्या ‘इंटरनॅशनल मॅन बुकर’ पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली. उत्तर आयर्लंडच्या ५६ वर्षीय लेखिका अ‍ॅना बर्न्‍स यांना यावर्षीचा मॅन बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी अनुवादित केलेल्या ‘मिल्कमन’ या कादंबरीला हा बहुमान प्राप्त झाला. गेल्या २० सप्टेंबरला या पुरस्कारासाठी संभाव्य साहित्यिकांची यादी जाहीर करण्यात आली होती. यादीत समाविष्ट ब्रिटिश कवी रॉबिन रॉबर्टसन, डेझी जॉन्सन, अमेरिकी लेखक निक डनासो, मायकेल ओदान्शी , अमेरिकी लेखिका रेचल कुशनेर आणि कॅनडियन लेखिका इसाय एडुग्यान यांना पिछाडीवर टाकत अ‍ॅना बर्न्‍स यांनी पुरस्कार पटकावला. याबाबतची घोषणा आज लंडनमध्ये करण्यात आली.

● आंतरराष्ट्रीय मॅन बुकर पुरस्कार

१) इंग्रजी साहित्याच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘ मॅन बुकर’ पुरस्कार हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मनाला जातो.

२) इंग्रजी अनुवादित आणि ब्रिटनमध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरी अथवा कथासंग्रहास हा पुरस्कार दिला जातो.

३) सन्मानचिन्ह, मानपत्र आणि ५० हजार पौंड असे या पुरस्काराचे स्वरूप असते. ही रक्कम लेखक-अनुवाद यांमध्ये समप्रमाणात विभागली जाते.

४) यावर्षीचा पुरस्कार अ‍ॅना बर्न्‍स यांना त्यांच्या ‘मिल्कमन’ या कादंबरीला हा बहुमान मिळाला आहे.

५) २००५ पासून दर दोन वर्षांनी दिला जाणारा हा पुरस्कार २०१६ पासून वार्षिक पध्दतीने देण्यास सुरुवात झाली.

◆◆◆

Exit mobile version