Site icon MarathiBrain.in

दोनपेक्षा जास्त अपत्य असलेल्यांना मताधिकार नकोच : बाबा रामदेव

लोकसंख्या नियंत्रणाचा उपाय म्हणून ज्यांना दोनपेक्षा जास्त अपत्य आहेत, अशा नागरिकांचे मताधिकार कायद्याने काढून घेण्यात यावे, असे विधान बाबा रामदेव यांनी केले आहे. 

 

वृत्तसंस्था एएनआय

नवी दिल्ली, २४ जानेवारी

वाढती लोकसंख्या हे देशासाठी युध्दापेक्षाही मोठे असलेले संकट आहे, त्यामुळे दोनपेक्षा जास्त अपत्य असलेल्यांचे मताधिकार काढून टाकण्यासाठी कायदा का करण्यात येत नाही, असा सवाल योगगुरू रामदेवबाबा यांनी आज केला आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

संग्रहित छायाचित्र

“वाढती लोकसंख्या ही देशाला संकटात टाकणारी बाब आहे. एखाद्या युध्दापेक्षा वाढती लोकसंख्या ही सर्वात मोठी संकटात टाकणारी बाब आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी ज्या नागरिकांना दोनपेक्षा जास्त मुलंबाळं आहेत, अशांचे मत देण्याचे अधिकार रद्द करण्यासाठी एखादा कायदा का तयार होत नाही?”, असा प्रश्न योगगुरू रामदेवबाबा यांनी उपस्थित केला आहे.

सोबतच, दोनपेक्षा जास्त अपत्य असलेल्या नागरिकांना, मग ते हिंदू असोत की मुस्लिम, पुरवल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा, नोकऱ्या व आरोग्यसेवा हे सर्व बंद करावे. सरकारी शाळा व रुग्णालयात यांना प्रवेश नाकारले जावे, असेही रामदेवबाबा म्हणाले. Bangalore Mirror

हेही वाचा : राम मंदिरासाठी संसदेने कायदा करावा : रामदेव बाबा

दुसरीकडे, प्रियंका गांधी यांच्या उत्तरप्रदेशमधील काँग्रेसचे नेतृत्व हाती घेण्याबाबतही त्यांनी मत व्यक्त केले आहे. रामदेवबाबा म्हणाले की ‘प्रत्येक राजकीय पक्ष लक्ष्याला गाठण्यासाठी नवनवे नेम धरत असतात. महत्त्वाचे हे आहे की कुणाचा नेम किती अचूक लागतो. बाकी, जे होत आहे ते चांगले होत आहे.’

रामदेव बाबा विकू शकतात ३० रुपयांत पेट्रोल

याआधीही रामदेवबाबा यांनी २०१८ मध्ये वैवाहिक जीवनसंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. माझ्यासारख्या ज्या ज्या लोकांनी लग्न केलेले, त्यांचा शासनाकडून विशेष सन्मान व्हायला हवा, असे त म्हणाले होते.

 

◆◆◆

 

विविस विषयांवरील माहितीपूर्ण लेख आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्याशी जुळून राहा फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर.

टेलिग्रामवर जॉईन व्हा www.t.me/marathibraincom ला.

Exit mobile version