Site icon MarathiBrain.in

स्वयंघोषित गुरू रामपालला जन्मठेप

हिसारच्या न्यायालयाने स्वयंघोषित गुरू रामपालला व अनुयायांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

 

हिसार, १६ ऑक्टोबर

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु रामपालला सतलोक हत्याकांडच्या प्रकरणात हिसार न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

हिसारच्या विशेष न्यायालयाने स्वयंघोषित गुरू रामपालला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

सतलोक हत्याकांड आणि हिंसाचार, अशा दोन वेगवेगळ्या हत्येच्या प्रकरणात हिसार न्यायालयाने स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू रामपालला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

 

रामपालवर असलेले हत्येचे आरोप

१. पाहिले प्रकरण, महिला भाविकेचा संशयास्पद मृत्यू . तिचे मृतदेह रामपाल बाबाच्या सतलोक आश्रममधून १८ नोव्हेंबर २०१४ ला ताब्यात घेण्यात आले होते.

२. दुसरे प्रकरण, रामपाल आणि पोलीस यांच्यात झालेल्या वादामुळे उद्भवलेल्या हिंसेचे आहे. ही हिंसा दहा दिवस चालली होती आणि त्यात ४ महिलांच्या व १ मुलाच्या मृत्यूचा समावेश आहे.

६७ वर्षीय रामपाल आणि त्याचे अनुयायी अटकेनंतर नोव्हेंबर २०१४ पासून कारागृहात बंदी होते. यांच्याविरुद्ध बरवाला पोलीस स्टेशनमध्ये १९ नोव्हेंबर २०१४ रोजी गुन्हा दाखल झाला होता.  ११ ऑक्टोबरला हिसारच्या एक विशेष न्यायालयाने रामपाल आणि त्याच्या २६ अनुयायांना दोषी करार दिला आहे.

रामपालला सुनावल्या जाणाऱ्या शिक्षेच्या पार्श्वभूमीवर हिसारमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. यानिमित्ताने संभावित किंवा उद्भवणाऱ्या कोणत्याही दंग्याला आणि हिंसेला तोंड देण्यासाठी पोलीसांनी कडक बंदोबस्त केले आहेत. हिसार जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आली आहे.

◆◆◆

Exit mobile version