Site icon MarathiBrain.in

१६ डिसेंबर : विजय दिवसाची ५० सुवर्ण वर्षे!

ब्रेनविशेष | सुवर्ण विजय दिवस


भारतीय सैनिकांनी 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानवर ऐतिसाहिक विजय मिळवल्याच्या पार्श्वभूमीवर देशात दरवर्षी 16 डिसेंबरला ‘विजय दिवस’ साजरा केला जातो. तसेच, 1971 च्या युद्धात बांग्लादेशाच्या मुक्तीसाठी भारतीय सेनेद्वारे पाकिस्तानवर विजय मिळवल्याच्या कारणास्तवही हा दिवस साजरा केला जातो.

भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान 1971 साली झालेल्या युद्धाला यंदा पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. आजच्याच दिवशी, म्हणजे 16 डिसेंबर 1971 ला तब्बल 93 हजारांच्यावर संख्या असलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्कारली आणि ह्या युद्धात भारतीय सेनेचा विजय झाला. भारताचे तिन्ही प्रमुख दल, भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदल यांच्या इतिहासातला सर्वांत मोठा विजय होता. 

नक्की वाचा 👉 कारगिल विजय दिन : अमर हुतात्म्यांची विजयगाथा

16 डिसेंबर म्हणजे भारतीय सैनिकांच्या शौर्यगाथेला सलाम करण्याचा दिवस आहे. 1971 च्या युद्धादरम्यान फिल्ड मार्शल मानेकशॉ यांच्या नेतृत्वाखालील भारतीय सैन्यांनी पाकिस्तानी सेनेवर आपला विजय मिळवला आणि पाकिस्तानमधून बांग्लादेशला स्वतंत्र करून बांग्लादेशच्या निर्मितीत भारताने महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारतीय लष्कराच्या याच गौरवशाली विजयाला आज पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय सैन्य व नागरिक हा दिवस ‘सुवर्ण विजय दिवस’ म्हणून साजरा करतात. 

१९७१ चे युद्ध थांबल्यावर भारतीय सेनेचे लेफ्टनंट जनरल जगजित सिंह अरोरा आणि पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल यांच्या दरम्यान बांग्लादेशमधील ढाका शहरात एक करार झाला होता. पाकिस्तानच्या विरोधातील या युद्धाच्या वेळी सुमारे 1500 भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. आणि हजारोच्या वर सैनिक गंभीर झाले होते.

 

सहभागी व्हा👉मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.in

Exit mobile version