Site icon MarathiBrain.in

ब्रेनबिट्स । काय आहे महाराष्ट्र शासनाची ताराराणी योजना?

प्रातिनिधिक छायाचित्र; स्रोत : UN Empowerment

ब्रेनबिट्ससागर बिसेन


कोव्हिड-१९ या महासाथरोगाच्या काळात राज्यातील विधवा झालेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी निर्णय महाराष्ट्र शासनाने नवे पाऊल उचलले आहे. यासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयानेवीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिध्दा योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

घरातील कर्ता पुरूष मृत्यूमुखी पडल्याने विधवा झालेल्या महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांना सन्मानजनक उपजीविका करता यावी, या उद्देशानी ही योजना सुरु करण्यात आल्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे. 

राज्याच्या ग्रामीण भागातील गरीब व जोखीमप्रवण महिलांना समृद्ध, सुरक्षित व आत्मसन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी राज्यात ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद ) माध्यमातून शाश्वत उपजीविकेच्या संधी प्राप्त करून देण्यासाठी अनेक उपक्रम व योजना राबवल्या जातात. याच अभियानाच एक भाग म्हणून कोव्हिड-१९ काळात घरातील कर्ता पुरुष गमावलेल्या राज्यातील महिलांसाठी वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिध्दा योजना राबवण्यात येईल. विविध योजनांममधील कृतीसंगमाच्या माध्यमातून ही योजना राबवली जाईल.

अशाच ज्ञानवर्धक बाबींसाठी क्लिक कराब्रेनबिट्स 

> वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिध्दा योजनेचे स्वरूप व लाभ 

जुलैअखेर ‘एक राष्ट्र, एक शिधापत्रिका’ योजना लागू करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला आदेश

> वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिध्दा योजनेची वैशिष्ट्ये  

  1. एकल/विधवा महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येणार तसेच त्यांच्या कुटुंबातील 18 ते 35 वयोगटातील युवक/युवती दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेण्यासही पात्र असतील.  
  2. 18 ते 45 या वयोगटातील युवक-युवतींना ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत (RSETI) 10 ते 45 दिवसांचे कृषी, प्रक्रिया उद्योग व उत्पादक विषयक प्रशिक्षण असे विविध व्यवसायांचे मोफत व निवासी प्रशिक्षण दिले जाणार. केंद्र शासनाच्या उन्नती योजनामध्ये पात्र असलेल्या एकल (विधवा) महिलांना यामध्ये प्राधान्य असेल.
  3. त्याचप्रमाणे, केंद्रशासन सहाय्यीत योजनेतही एकल/विधवा महिला आणि त्यांच्या कुटुंबियांना अन्न प्रक्रिया उद्योगासाठी ऑनलाईन नोंदणीद्वारे बीज भांडवल देण्यात येईल.  

संपूर्ण शासकीय परिपत्रक बघण्यासाठी पुढे क्लिक करा : वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिध्दा योजना

 

(मराठी ब्रेनवर प्रकाशित होणारे लिखाण व बातम्या मूळ आणि कॉपीराईट आहेत. तरीही, यावरील मजकूर चोरताना, दुसरीकडे छापताना अथवा इतरत्र सामायिक करताना ते साभार करत चला. संबंधितांनी याविषयी काळजी घ्यावी.) 

सहभागी व्हा 👉 मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा  www.marathibrain.inसोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Exit mobile version