Site icon MarathiBrain.in

२०२१-२२ सत्रासाठी सीबीएसईची विशेष योजना; जाणून घ्या बदल!

ब्रेनवृत्त । नवी दिल्ली


केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) २०२१-२२ या  शैक्षणिक सत्रातील इयत्ता १० वी व १२ वीच्या मंडळाच्या परीक्षांसाठी (Board Exams) विशेष मूल्यमापन योजना काल (सोमवारी) जाहीर केली. नवीन मूल्यांकन आराखड्यानुसार दोन्ही वर्गांचे शैक्षणिक सत्र दोन सत्रांमध्ये विभागण्यात येईल, ज्यांमध्ये प्रत्येकी ५० टक्के अभ्यासक्रम असेल. 

सीबीएसईने १० वी व १२ वीच्या परीक्षांसाठी तयार केलेल्या या योजनेनुसार, प्रथम सत्रांत परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात घेण्यात येईल, तर द्वितीय सत्रांत परीक्षा मार्च-एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात येईल.

हेही वाचा । ऑक्सिपार्क प्रकल्पावरून पुणे विद्यापीठाला उच्चशिक्षण मंत्र्यांची फटकार!

सोबतच, माध्यमिक शिक्षण मंडळाने असेही सांगितले, की २०२१-२२ वर्षासाठीचे वर्ग १० वी व १२ वीचे सुधारित अभ्यासक्रम तयार करण्यात येईल आणि ते जुलैअखेर जाहीर करण्यात येईल. 

तसेच, मंडळाच्या परीक्षांच्या दृष्टिकोनातून अंतर्गत मूल्यमापन व प्रकल्प कार्य आदी. अतिशय योग्य आणि विश्वासार्ह असतील यासाठी अधिक प्रयत्न केले जाणार असल्याचेही मंडळाने म्हटले आहे. जीवघेण्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदाच्या १० वी व १२ वीच्या मंडळाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सीबीएसईने आधीच घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.

 


अशाच विविध विषयांवरील माहितीपूर्ण बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी भेट द्या www.marathibrain.in ला.

 

👉 फॉलो करा आम्हाला ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब, टेलिग्राम इत्यादींवर.

 

📧 ✒️ तुमचे लिखाण, प्रतिक्रिया व सूचना writeto@marathibrain.in वर नक्की पाठवा.

Exit mobile version