Site icon MarathiBrain.in

अन् राहुल निघाले ट्रॅक्टर घेऊन संसदेकडे !

ब्रेनवृत्त । नवी दिल्ली


भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी हे तिन्ही कृषी कायद्यांच्या विरोधात थेट ट्रॅक्टर चालवत संसदेकडे निघाले. पण, थोड्याच वेळात दिल्ली पोलिसांनी जेष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला आणि इतर काँग्रेस नेत्यांनासमोर जाण्यापासून अडकवले.

मागील वर्षी संसदेत पारित करण्यात आलेल्या तिन्ही कृषी कायद्यांच्या विरोधात विरोध प्रदर्शित करण्यासाठी राहुल गांधी काही काँग्रेस समर्थकांसह थेट ट्रॅक्टर चालवून संसदेकडे गेले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना राहुल यांनी संबंधित वादग्रस्त कृषी कायदे रद्दबातल केले  जावेत अशी मागणी केली. दरम्यान, काहीच वेळात दिल्ली पोलिसांनी विरोधकांच्या ट्रॅक्टर मोर्च्याला अर्ध्यातच थांबवून रणदीप सिंह सुरजेवालांसह काही काँग्रेस नेत्यांना अडवून धरले.

कृषी कायद्यांच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राहुल गांधी म्हणाले, “मी संसदेत शेतकऱ्यांचा संदेश घेऊन आलो आहे. शासन शेतकऱ्यांच्या आवाजाला दाबून टाकत आहे आणि संसदेत त्याविषयी चर्चाच होऊ देत नाही आहे. त्यांना हे असे काळे धोरण रद्द करावे लागतील. संपूर्ण देशाला माहिती आहे, की हे कायदे फक्त देशातील २-३ मोठ्या व्यापाऱ्यांच्याच हिताचे आहेत.”

ब्रेनसाहित्य शेतकरीच धारेवर का?

“आमचे शेतकरी कृषी कायद्यांपासून खुश आहेत आणि जे त्या कायद्यांचा विरोध करत आहेत, ते दहशतवादी आहेत असे शासन म्हणते. पण वास्तविकता तर ही आहे, की शेतकऱ्यांचे हक्कच हिरावून घेतले जात आहेत”, असेही राहुल गांधी म्हणाले आणि तिन्ही कायदे रद्द करण्यात यावेत असा आग्रह त्यांनी धरला.

दरम्यान, यावेळी फौजदारी संहितेच्या अनुच्छेद १४४ चे उल्लंघन झाल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी काँग्रेसचे महासचिव रणदीप सुरजेवाला, युवक काँग्रेस प्रमुख श्रीनिवास बीव्ही आणि इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. 

 हेही वाचा । सत्तेसाठी शेतकऱ्यांना पेचात पाडू नका : शिवसेनेचे भाजपवर टीकास्त्र

पंजाब, हरयाणा व  उत्तर प्रदेशातील हजारों शेतकरी मागील ८ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर तिन्ही कृषी कायद्यांच्या विरोधात विरोध प्रदर्शन करत आहेत. दुसरीकडे, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर २०० शेतकऱ्यांच्या एका समूहाचे दिल्लीच्या जंतर मंतरवर धरणे आंदोलन सुरु आहे.

सोबतच, संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) काल जाहीर केले, की सोमवारी महिला आंदोलक जंतर मंतरवर शेतकरी आंदोलनाला आठ महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘किसान संसद’चे आयोजन करतील. जवळपास ४० शेतकरी संघटनांनी संयुक्तपणे जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की शेकडो महिला या किसान संसदेत सहभागी होण्यासाठी दिल्लीच्या सीमेकडे पोहचत आहेत.

Join @ मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Exit mobile version