Site icon MarathiBrain.in

फेसबुक, व्हाट्सऍप, इंस्टा सगळंच ठप्प!

ब्रेनवृत्त | मुंबई


फेसबुकच्या मालकीचे असलेले फेसबुक, व्हाट्सऍप व इन्स्टाग्राम ही समाजमाध्यमांचे सर्व्हर जगभरात ठप्प (डाउन) झाले आहे. भारतातील वापरकर्ते (युझर्स) आज रात्री साडेआठ वाजेपासून फेसबुक, व्हाट्सऍप आणि इन्स्टाग्रामची सेवा ठप्प झाल्याचे अनुभवत आहेत.

ही तिन्ही समाजमाध्यमे वापरणाऱ्या अनेक युजर्सनी मोबाइल अनुप्रयोगावरूनही संबंधित सेवा वापरण्याचा प्रयत्न केला. परंतु, कुठेही ते काम करत नसल्याने अनेक वापरकर्त्यांनी एकमेकांशी संपर्क साधला व त्यानंतर फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हाट्सऍप जगभरात ठप्प झाल्याचे वृत्त समोर आले. त्यांनंतर काही वेळानंतर फेसबुक व व्हाट्सऍपने याविषयी अधिकृतपणे जाहीरही केले.

व्हाट्सऍप, फेसबुक व इन्स्टाग्राम ही माध्यमे ठप्प झाल्याने ट्विटरवरून हा विषय चर्चेचा बनला आहे. संबंधित टॅग्स ट्रेंडमध्ये आहेत. दरम्यान, सेवा ठप्प होण्यामागचे ठोस कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ट्विटरवर अनेकांनी फेसबुक, व्हाट्सऍप आणि इन्स्टग्राम चालत नसल्याचे अनेक स्क्रीनशॉट सामायिक (शेअर) केले आहेत.

ह्या सेवा ठप्प झाल्याच्या काही मिनिटांतच जवळपास २०,००० वापरकर्त्यांनी व्हाट्सऍप बंद पडल्याचे, तर सुमारे ८०,००० लोकांनी फेसबुक बंद पडल्याची तक्रार नोंदवली. यामुळे लाखों वापरकर्ते प्रभावित झाले आहेत. 

 

सहभागी व्हा👉मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

 

Exit mobile version