भारतात लवकरच सुरू होतंय ‘व्हाट्सऍप पे’ !

ब्रेनवृत्त, ६ मे

तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर व्हाट्सऍप आपल्या वापरकर्त्यांसाठी मे महिन्याच्या शेवटपर्यंत भारतात आपली ‘देयक सेवा’ (पेमेंट सर्विस) सुरु करणार आहे. भारतासाठी ही सेवा गेल्या दोन वर्षांपासून  बीटा टेस्टिंग फेजमध्ये अडकली होती. देयक पद्धतीमध्ये (पेमेंट मेथड) येणाऱ्या काही तांत्रिक अडचणींमुळे भारतात ‘व्हाट्सऍप पे‘ ही देयक सुविधा अधिकृतपणे सुरू करण्यात अडथळा येत होता. मात्र,आता तिचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच ही सेवा ग्राहक-वापर्कत्यांसाठी उपलब्ध होणार आहे.

मनी कंट्रोलच्या एका अहवालानुसार, भारतीय ग्राहकांसाठी मे महिन्याच्या अखेरपर्यंत ‘व्हाट्सऍप पे’ अधिकृतरित्या लॉन्च होणार आहे. भारतात वर्तमान स्थितीत सुमारे 400 मिलियन व्हाट्सऍप वापरकर्ते आहेेेत.   दरम्यान, देयक प्रक्रियेसाठी ‘भारतीय रिझर्व्ह बँके‘च्या डेटा लोकलायझेशनशी निगडीत मापदंडांचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे ‘व्हाट्सऍप पे’ भारतात लॉन्च होण्यासाठी उशीर होत आहे. तसेच, व्हाट्सऍप या पेमेंट सर्विसला टप्याटप्याने सुरु करणार असल्याची माहिती व्हाट्सऍप दिली आहे.

हेही वाचा : २६.७ कोटी फेसबुक वापरकर्त्यांची माहिती उघडकीस !

त्याचप्रमाणे, ही सेवा आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकेसोबतही लॉन्च करण्यात येणार आहे. भारतीय स्टेट बँक ‘व्हॉट्सऍप पे’साठी एक भागीदार बँक आहे. भारतात बँका ‘यूपीआय (UPI)’मार्फत देयक सुविधा देतात. दरम्यान, आता व्हॉट्सऍप देशातील डिजिटल व्यवहाराला चालना देण्यास फायदेशीर ठरणार असून ही सर्विस Google Pay आणि Paytm टक्कर देऊ शकते.

कसे तयार कराल ‘व्हाट्सऍप स्टिकर्स’ ?

दुसरीकडे, भारत हा पहिला देश आहे. जिथे फेसबुकची मालकी असणारी कंपनी देयक सेवा (पेमेंट सर्व्हिस) सुरू करणार आहे. भारतातील व्हाट्सऍपचे वापरकर्ते बघता ‘व्हॉट्सऍप पे’ला भारतात उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

● व्हाट्सऍप आणणार नवे ५ फिचर

गेल्या काही वर्षांमध्ये व्हाट्सऍपचा वेगाने वाढणारा वापर पाहता, सध्या कंपनी आणखीन काही नवीन वैशिष्ट्यांवर (फिचर्स) काम करत आहे. वापर्कत्यांना अजून सोयीस्कर सेवा देण्यासाठी काही नवीन फिचर्सचे टेस्टिंगही सुरू आहे. यांमध्ये प्रामुख्याने  इन ऍप ब्राऊजर, सर्च इमेज फिचर,  फॉर्वर्डिंग इंफो, फिचर, फ्रिक्वेंटली फॉर्वर्ड फिचर आणि शॉर्ट लिंक फिचर यांचा समावेश आहे. तर, व्हाट्सऍप स्टिकर, जीआयएफ, लाईव्ह लोकेशन शेअरिंग यांसारखे काही फिचर आधीपासूनच व्हाट्सऍपद्वारे जोडले गेले आहेत.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: