Site icon MarathiBrain.in

पश्चिम बंगाल पुनर्नामित करण्यास ममतांची मोदींनी विनंती

ब्रेनवृत्त, नवी दिल्ली

पश्चिम बंगाल राज्याचे नाव बदलण्याची मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या मुहूर्तावर भाजप व ममता यांच्या बरीच राजकीय वादावादी झाली असताना, कालच्या भेटीकडे सर्व राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले होते.

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी घेतलेल्या या भेटीत बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल राज्याचे नाव बदलून ‘बांग्ला’ करण्याचीही विनंती केली. सोबतच, नवरात्री महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी राज्याला भेट देण्याचेही आमंत्रण दिले. सोबतच, ममता यांनी नवरात्रोत्सव संपल्यानंतर मोदींना देवचा पचमी या जगातल्या दुसऱ्या सर्वात मोठ्या कोळसा क्षेत्राचे उद्घाटन करण्यासाठही आमंत्रित केले आहे. या भेटीच्या वेळी बॅनर्जी यांनी त्यांना कुर्ता आणि मिठाईही भेट दिली.

या चर्चेवेळी पश्‍चिम बंगालचे नाव बदलण्याची आणि राज्यासाठी 13,500 कोटी रुपयांच्या निधीचीही मागणी केली. पंतप्रधानांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे ममता यांनी सांगितले. सोबतच, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिका (एनआरसी) हा आसाम कराराचा भाग होता. इतर ठिकाणी त्याची तरतूदच नव्हती, याकडेही पंतप्रधानांचे लक्ष वेधल्याचे ममता बॅनर्जी यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

प. बंगालमध्येही सीबीआयला ‘नो एन्ट्री’

दरम्यान, कालची भेट ही राजकीय भेट नसल्याचेही बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे. सोबतच, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचीही भेट घेण्यास त्या उत्सुुुक त्या बोलल्या आहेत.

 

◆◆◆

Exit mobile version