Site icon MarathiBrain.in

लागा अभ्यासाला! १०वी व १२वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर!

प्रातिनिधिक छायाचित्र

ब्रेनवृत्त | मुंबई


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या २०२१-२२ या शैक्षणिक सत्रासाठीच्या अंतिम परीक्षांचे वेळापत्रक राज्य शासनाने जाहीर केले आहे. पुढील वर्षी मार्च महिन्यापासून दोन्ही वर्गांच्या परीक्षा पारंपरिक लेखणी व कागद पद्धतीने (ऑफलाईन) आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

संग्रहित छायाचित्र

वाचा | स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी ‘बार्टी’ची नवी योजना

महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. राज्य शिक्षण मंडळाद्वारे आयोजित माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) व उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली असून बारावीची लेखी परीक्षा ४ मार्चपासून, तर दहावीची लेखी परीक्षा १५ मार्चपासून सुरू होईल. लेखी परीक्षेच्या आधी दोन्ही वर्गांसाठीच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा पूर्ण केल्या जातील. 

मोठी बातमी : वैद्यकीय व दंत शिक्षणात ओबीसी व ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना आरक्षण जाहीर!

● असे आहे वेळापत्रक…

राज्यातील १०वीच्या बोर्डाची प्रत्यक्ष लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिलपर्यंत आयोजित होईल. तसेच, दहावीच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी ते 1४ एप्रिल दरम्यान पार पडतील.

दुसरीकडे, नेहमीप्रमाणे १२वीच्या लेखी परीक्षा १०वीच्या आधी सुरू होणार आहेत. १२ वी बोर्डाची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिलदरम्यान आयोजित होईल, तर तोंडी आणि प्रात्यक्षिक १४ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान पूर्ण करावे लागतील. 

 

सहभागी व्हा👉मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.in

Exit mobile version