ATM ट्रान्झॅक्शन फेल अन पैसेही कट…असा अनुभव अनेकांना आला असेल!?
सर्व्हरमध्ये अचानक आलेले कँझेशन किंवा अन्य कारणाने अनेक ग्राहकांना transation केल्यानंतर पैसे कट झाल्याचा msg येतो पण
पैसे काही बाहेर येत नाहीत अशावेळी बऱ्याचदा लोकं गोंधळून जातात अशावेळी काय कराल?
१) ताबडतोब बँकेशी संपर्क करा
_खातेधारकाने आपल्या बँकेचे एटीएम किंवा अन्य कोणत्याही एटीएममधून पैसे काढताना कॅश आलीच नसेल आणि पैसे कट झाले असतील तर ATM जवळच्या कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क करायला हवा. तुमची तक्रार नोंदवून घेतली जाईल आणि त्यावर कार्यवाहीसाठी एक आठवड्याची मुदत तुम्हाला दिली जाईल.
२) ताबडतोब तक्रार नोंदवा
_भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, प्रत्येक एटीएममध्ये संबंधित अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक, टोल फ्री क्रमांक 1800 11 400 यावर तक्रार नोंदवू शकता, हेल्प डेस्क क्रमांक असणे अनिवार्य आहे. त्यावर संपर्क करुन तुम्ही तक्रार नोंदवू शकता.
३) ट्रांझेक्शन स्लिप घ्या
_ट्रांझेक्शन फेल झाले असले तरीही त्याची स्लिप तुम्हाला सोबत ठेवावी लागेल. त्यामुळे एटीएममधून रिसिप्ट घ्यायला कधी विसरू नका. ट्रांझेक्शन स्लिपमध्ये एटीएमचा आयडी, लोकेशन, वेळ आणि बँकेकडून मिळालेला रिस्पॉन्ड कोड प्रिंट झालेला असतो!
३) २४ तासांचा अवधी
_ग्राहक आपल्या बँकेतून पैसे काढण्यास गेला आणि एटीएममधून कोणत्या कारणात्सव रक्कम न निघाल्यास 24 तास अवधी द्यावा लागतो. बँकेकडून झालेल्या चुकीचे २४ तासात निराकरण होते आणि पैसे क्रेडिट केले जातात!
५) दिवसात पैसे जमा करणे अनिवार्य
_जर एटीएम ट्रान्झॅक्शन फेल झाल्यानंतर तुमच्या खात्यातून पैसे कापले गेले असतील, तर बँकेला सात कामाच्या दिवसांत ते पैसे तुमच्या खात्यात पुन्हा जमा करणे अनिवार्य आहे!
७) देईल रोज १०० रूपये भरपाई
_तक्रार केल्याच्या सात दिवसांच्या आत जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. तर, बँकेला दर दिवसाला १०० रुपये इतकी भरपाई ग्राहकाला द्यावी लागते. यासाठी ग्राहकाला दावा करण्याची गरज नसते. मात्र, भरपाईसाठी ग्राहकाला ट्रान्झॅक्शनच्या ३० दिवसांच्या आत तक्रार दाखल करणे गरजेचं आहे._
८)लोकपालाकडे तक्रार करा
_जर निश्चित वेळेत तुमच्या समस्येचं समाधान झालं नाही. तर बँकेकडून उत्तर मिळाल्याच्या ३० तीस दिवसांच्या आत तुम्ही बँकेच्या लोकपालकडे यासंबंधी तक्रार करु शकता.
९) जर बँकेकडून व्यवस्थित समाधान होत नसेल तर www.consumerhelpline.gov.in वर थेट तक्रार नोंदवू शकता.
◆◆◆
विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.