Site icon MarathiBrain.in

नीट परीक्षेची तारीख जाहीर; आजपासून अर्जप्रक्रिया सुरू

ब्रेनवृत्त | नवी दिल्ली


केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने वैद्यकीय पदवी शिक्षणासाठीच्या नीट युजी (NEET UG) प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. येत्या १२ सप्टेंबर २०२१ कोव्हिड-१९ च्या नियमांचे पालन संपूर्ण देशभरात ही परीक्षा आयोजित करण्यात येईल. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबत काल माहिती दिली.

“राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा २०२१ (नीट युजी २०२१) 12 सप्टेंबर रोजी संपूर्ण देशभरात पार पाडली जाणार असून, यासाठी आज संध्याकाळी ५ वाजेपासून अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू होईल”, असे धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

हेही वाचा | २०२१-२२ सत्रासाठी सीबीएसईची विशेष योजना; जाणून घ्या बदल!

कोव्हिड-१९च्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळण्यासाठी म्हणून परीक्षा केंद्राच्या संख्यांही वाढवण्यात आल्या आहेत.  परीक्षा शहरांची संख्या १55 वरून १९८ करण्यात आली आहे. तर आधी 3862 परीक्षा केंद्र होते, आर त्यांमध्येही वाढ करण्यात येईल, असेही प्रधान यांनी सांगितले.

कोव्हिड-१९ संबंधित नियमांचे पालन करण्यासाठी म्हणून परीक्षेच्या सर्व परीक्षार्थींना केंद्रामध्ये मुखपट्ट्या (फेस मास्क) उपलब्ध करून देण्यात येईल. शिक्षण मंत्र्यांनी असेही सांगितले, की प्रवेश आणि निकासाच्या वेगवेगळ्या वेळा, स्पर्शरहीत नोंदणी, सुयोग्य स्वच्छता, सामाजिक अंतरासह बैठक व्यवस्था इ. बाबींचीही खातरजमा केली जाणार आहे.

 

Join @ मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Exit mobile version