निवडणुका येतात, होतात आणि संपतात. परत तेच चक्र नव्याने सुरू होत. मात्र, यात सामान्य माणसाला पडणारे प्रश्न हे तसेच राहतात, नव्याने निवडणुका आल्या तरी हे प्रश्न तसेच कायम राहतात. या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित करणारी ही ‘कविता’…
अंधारात होत्या ज्या पणत्या, त्या पेटतील पुन्हा,
ओढवला ज्यांनी अंधार तेच भेटतील पुन्हा…!
गाजतील तीच खोटी अन् जुनी भाषणे पुन्हा,
होईल जात, पंथाच्या नावावर निवडणूक पुन्हा…!
गडगंज श्रीमंत ठोकतील बापाच दार पुन्हा…!
कार्यकर्ता स्वतःच्या खिशाकडे हात करून खुणावेल पुन्हा..!
मग लोकशाहीत स्वाभिमान विकला जाईल पुन्हा,
अंधारातल्या पणत्यांची वनसावली पडेल पुन्हा…!
(इथे प्रकाशित होणाऱ्या लेख, साहित्य व विचारांशी मराठी ब्रेन सहमत असेलच असे नाही.)
विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.